• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

गुढीपाडवा या सणाला कोरोनो चे संकट


पाताळगंगा / काशिनाथ जाधव :

सध्या कोरोनो हा संपूर्ण जगात धुमाकूळ घालत असल्यामुळे सध्या महाराष्ट्रात सुद्धा शिरकाव केला आहे.

आठवड्यातील बाजारपेठ मोठ मोठी दुकाने बंद झाली आहेत. सण आला की नागरिकांची गर्दि खरेदीसाठी झालेली असते. त्यातच गुढीपाडवा हा मराठी माणसांचा मराठी महिन्यातील पहिला मोठा सण काही तासांवर येवून ठेपला असल्यामुळे या सणाला कोरोनो सारखी वाईट नजर लागली असून अनेक ठिकाणीची बाजारपेठ माणसांच्या वर्दळ मुळे ठप्प झाली आहे.सण कोणताही असला तरी सुद्धा तो साजरा करण्यात येत असतो.यासाठी आठवडाभर आगोदरच तयारी सुरु असते मात्र सध्या महाराष्ट्रात कोरोनो मुळे सर्वच काही हिरावून घेतल्या सारखे झाले आहे.

मराठी माणसांचा येणारा नविन वर्षातील गुढीपाडवा हा सण साजरा करण्यासाठी महिनाभर अगोदर ढोल ताशे यांचे नाद घुमत असतात.मात्र यावर्षी  कोरोना च्या भितीमुळे ढोल ताशे तालीम होतांना दिसत नाही.शिवाय हा कोरोना पसरु नये यासाठी नागरिकांनी भेटी- गाठी थांबविण्यात आल्या आहेत.शक्य असल्यास  बाहेर जात असतांना आपली सुरक्षा महत्वाची असे धोरण मनाशी ठरवून बाहेरील प्रवास करावा असे सांगण्यात येत असते.

कोरोनो मुळे अनेकांच्या रोजगारा गदा येत चालली शिवाय या अनेकांचा रोजगार बुडत चाललें आहे.मात्र कोरोना चा वाढता प्रभावा मुळे अनेक ठिकाणी बंद ची हाक सुरुच आहे.दरवर्षी प्रमाणे गुढीपाडवा साठी पंधरा दिवस अगोदर तयारी केली जात असते. मात्र यावर्षी चित्र थोडे वेगळे झाल्याचे पहावयास मिळत आहे.

मात्र चीन मधून आलेला कोरोना आता महाराष्ट्रात शिरकाव करुन दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे खबरदारी म्हणून प्रत्येक त्यांचे पालन करीत आहे एकंदरीत गुढीपाडवा या सणावर कोरोना चे संकट म्हणावे लावेल.

4 views0 comments