• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

hakkasathiandolan.com4

भेटवस्तू नको रक्तदान करा; मा.आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या आवाहनाला उस्फुर्त प्रतिसाद

आंदोलन : प्रतिक चाळके

उरण मतदार संघाचे मा.आमदार मनोहरशेठ भोईर यांचा वाढदिवस १ जून रोजी असून शिवसैनिक मोठ्या उत्साहात साजरा करत असतात. परंतु ह्या वर्षी जगावर आलेल्या कोरोना विषाणूच्या संकटामुळे महाराष्ट्रात अनेक नागरिकांवर कोरोना विषाणूची लागण झाली आहे. राज्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात कोरोना विषाणूच्या रुग्णावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रक्ताची गरज भासत असल्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे, आरोग्य मंत्री राजेशजी टोपे यांनी रक्तदात्यांना रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आवाहनाला उरण मतदार संघाचे मा.आमदार मनोहरशेठ भोईर यांनी आपला वाढदिवस साजरा न करता कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना आवाहन केले की ह्यावर्षी भेटवस्तू बदल्यात रक्तदान व मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी कमीत कमी १००० रुपये देऊन माझा वाढदिवस साजरा करा असे आवाहन करण्यात आले होते. मा.आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या आवाहनाला कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला असून कामोठे येथील MGM रुग्णालयाचे आणि डॉ. राजेश अत्तरडे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.

आजिवली येथे जनता विद्या मंदिर हायस्कुल येथे रक्तदान शिबिराला महाड मतदार संघाचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिर पार पडले. तसेच मा.आमदार मनोहर भोईर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी १ लाख रुपये देण्याचे जाहीर केले. यावेळी तालुका प्रमुख रघुनाथ पाटील, युवसेना अधिकारी रायगड जिल्हा अवचित राऊत,विभाग प्रमुख सुधीर पाटील, उपविभाग प्रमुख अशोक ठाकूर, मारुती म्हात्रे यांच्या सह शाखाप्रमुख शिवसैनिक शोषल डिस्टन्स च्या नियमाचे पालन करून उपस्थित होते.