• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

31 journalists beat Corona

31 पत्रकारांची कोरोनावर मात

मुंबई : मुंबईतील 31 पत्रकारांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्यांचा कोरोना चाचणीचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

या सर्व रुग्णांना 14 दिवस होम क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला असून याविषयी मुंबई महापालिकेने माहिती दिली आहे.

माध्यम प्रतिनिधींसाठी नुकत्याच घेण्यात आलेल्या व्यापक तपासणी मोहिमेनंतर त्यांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यात मुंबईतील पत्रकार व कॅमेरामन्स मिळून 53 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते.

दरम्यान, त्यातील 31 पत्रकारांचे चाचणी अहवाल दुसऱ्यांदा निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.