• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

3000 गरीब गरजूना देणार दोन वेळचे भोजन

पनवेल महानगरपालिका व पनवेल तहसिल कार्यालय यांच्या मार्फत तळोजा परिसरात कम्युनिटी किचन सेंटर सुरू.

3000 गरीब गरजूना देणार दोन वेळचे भोजन


तळोजा :- पनवेल महानगरपालिका व तहसील कार्यालय यांच्या मार्फत प्रभाग क्रमांक 2मधील देविचापाडा, पडघे, तोंडरे, डोगरेपाडा, पालेखुद॔ या ठिकाणी दिनांक 26 एप्रिल पासून कम्युनिटी किचन सेंटर चालू करण्यात आला आहे. जेणेकरून या परिसरातील गरीब, गरजू, मजूर, अस्थापित कामगार, बंजारा समाज, परप्रांतीय, निराधार अशा तीन हजार ते चार हजार लोकांना दोन वेळचे मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. जेणेकरून या परिसरातील गरीब गरजू, मजूर उपाशी रहाता कामा नये या उद्देशाने हि सेवा सुरू केली असल्याचे अधिकार्यानी म्हटले आहे.

या परिसरात दररोज जीवनावश्यक वस्तूंचा वाटप करून सुद्धा मोठ्या प्रमाणावर काहि लोकांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. तसेच जिवनावश्यक वस्तूच्या नावाखाली अनेक लोक रस्त्यावर फिरताना दिसतात. पण आता थेट किचन सेंटरच त्यांच्या दरवाज्यात आला आहे. त्यामुळे कदाचित या परिसरात भाजीपाला व जिवनावश्यक घेण्यासाठी गर्दी होणार नाही अशि अपेक्षा करणे वावगे ठरणार नाही. तसेच या परिसरातील गरीब, गरजू, मजूर, निराधार आता उपाशी राहाणार नाही. 26 एप्रिल पासून ते 3 मे पर्यत लाॅकडाऊन संपेपर्यंत हि सेवा दररोज तीन हजार लोकांना दोन वेळा दिली जाईल असे नावडे उपविभागीय अधिक्षक हरिश्र्चंद्र कडू यांनी सागितले आहे. उशीरा का होईना पण पमपाला प्रभाग क्रमांक 2मधील गरीब, गरजूची आठवण आली. यामुळे या परिसरातील समाजसेवकांवरील ताम कमी होण्यास मदत होईल. प्रभाग समिती 'अ' अन्नधान्या समितीचे प्रमुख भगवान पाटील, नावडे उपविभाग अधिक्षक हरिश्र्चंद्र कडू, तसेच रमाकांत तांडेल, व पनवेल तहसिल कार्यालयाचे कम॔चारी यांच्या देखरेखीखाली आज हा एक उपक्रम हुरू करण्यात आला आहे. लोकांना जिवनावश्यक वस्तू देवून काहीच उपयोग होत नसल्यानेच हा प्रयोग करावा लागला असल्याचे पमपाचया अधिकार्याकडून सागण्यात आले. ---------------------------------- आज दिनांक 26/4/2020 रोजी   पनवेल महानगरपालिका व  पनवेल तहसीलदार यांच्या संयुक्तपणे स्थापित केलेल्या कम्युनिटी किचन सेंटर द्वारे पडघे-850, तोंडरे-610, देविचापाडा-920, ढोंग-याचापाडा-520, पालेखुर्द-100 असे एकुण - 3000 बेघर, निराधार, विस्थापीत  कामगार व गरजू व्यक्तींना दुपारचे  भोजन वाटप करण्यात आले.