• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

३ मे नंतर "रेड झोन" वगळता इतर ठिकाणी लॉक डाउनमध्ये शिथिलता ; मुख्यमंत्री - उद्धव ठाकरे


प्रतिनिधी : प्रतिक चाळके

देशभरासह राज्यात सुद्धा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा वाढत असून महाराष्ट्र राज्यात मुंबई, पुणे, नाविमुंबई यांसह काही ठिकाणी कोरोनाच्या रुग्णांची ही वाढत असून त्या ठिकाणांना "रेड झोन' म्हणून घोषित केले आहे. तर काही ठिकाणी लॉक डाउन शिथिलकरण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मराठी दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देत राज्यातील नागरिकांशी संवाद साधला.


कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता राज्यात ज्या ठिकाणी "रेड झोन" अलर्ट केलं आहे त्या ठिकाणी लॉक डाउन राहणार आहे. परंतु "रेड झोन" व्यतिरिक्त ज्या ठिकाणी ग्रीन आणि ऑरेंज झोन आहे तिथे आता पेक्षा अधिक मोकळी दिली जाईल, पण ही शिथिलता देताना कोणतीही घाई गडबड करण्यात येणार नसून तुम्हीही मोकळीक दिल्यानंतर काळजी घ्यायची आहे. नाहीतर आजवर केलेल्या तापश्चर्येवर पाणी फिरेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांशी संवाद साधताना सांगितले.