• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

हे वागणं बरं नव्ह , कर्जतमध्ये भाजपबद्दल चर्चा !

वरच्यांचे ऐकून आंदोलन करता, तर पालिकेत सत्तेचा वाटा खाता, हे वागणं बरं नव्ह, कर्जतमध्ये भाजपबद्दल चर्चा !

कर्जत (भिसेगाव) : सुभाष सोनावणे

कोरोना विषाणू महामारीच्या युद्धात अपयशी ठरलेल्या महाआघाडी सरकारवर आरोप करत ठाकरे सरकारचा जाहीर निषेध संपूर्ण राज्यात काल भाजपने करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी आंदोलन केले. त्याप्रमाणे कर्जतमध्येही कर्जत मंडळ भाजपच्या वतीने बॅनरबाजी करत आपला निषेध व्यक्त केला. मात्र कर्जतमध्ये ज्या ठाकरे सरकारचा कर्जत मंडळ भाजपाने निषेध व्यक्त केला त्या शिवसेना पक्षाबरोबर कर्जत नगर परिषदेत युतीच्या माध्यमातून सत्तेचा वाटा बरोबरीने खात असल्याने राज्यात युती नसताना पालिकेत सत्तेची फळ खाता तर वरच्यांचे ऐकून निषेध आंदोलन करता , हे वागणं बरं नव्ह , अशी उपहास्यांत्मक चर्चा कर्जतमध्ये होत आहे .

मार्च महिन्यापासून ते आजपर्यंत कोरोना विषाणू संसर्ग महामारीला रोखण्यासाठी देशाबरोबरच राज्याचे महाआघाडी सरकार प्रयत्न करत आहेत . शासनाचे दिलेले आदेश , नियम समस्त नागरिक काटेकोरपणे पाळत आहेत . जनता कर्फ्यू , संचारबंदी , लॉकडाऊन , सोशल डिस्टन्सीग , मास लावणे , आदी देशव्यापी लढ्यात नागरिक सामील होताना दिसत आहेत , व कोरोनाची साखळी तोडण्याचे प्रयत्न करत आहेत . या देशव्यापी लढ्यात सर्वांची साथ असताना भाजपने राज्यात वाढत असलेले कोरोना रुग्ण पाहून व इतर मुद्दयांमुळे ठाकरे सरकार अपयशी ठरलेले आहे , म्हणून त्यांचा जाहीर निषेध केला आहे .

मात्र ज्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत , त्या शिवसेना पक्षाचा कर्जत नगर परिषदेत नगराध्यक्ष असून उपनगराध्यक्ष तसेच इतर सभापती पदे युतीच्या माध्यमातून भाजपकडे आहेत , म्हणूनच सत्तेची फळे खात असताना त्याच पक्षाच्या मुख्यमंत्री असलेल्या ठाकरे सरकारचा जाहीर निषेध कर्जत भाजप मंडळने केल्याने कर्जतमध्ये उलट सुलट चर्चा होत असताना दिसत आहेत , वरच्यांचे ऐकायचे निषेध आंदोलन करायचे तर स्थानिक कर्जत नगर परिषदेत शिवसेने बरोबर राहून सत्तेचा मलिदा खायचा , हे कसले राजकारण , हे वागणं बरं नव्ह , अशी उपहास्यांत्मक चर्चा कर्जतमध्ये होत असून , कोरोना विषाणू संसर्ग महामारीच्या काळात केलेले राजकारण योग्य नाही , अशी चर्चा देखील कर्जतमध्ये होत असताना दिसत आहे .