• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

ह.भ.प श्री.रघुनाथ पाटील यांच्याकडून विश्व धर्म वारकरी सामाजिक संस्थेला आर्थिक मदत


प्रतिनिधी : प्रतिक चाळके

उरण विधानसभा पनवेल तालुका प्रमुख ह.भ.प. श्री. रघुनाथ पाटील यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून विश्व धर्म वारकरी सामाजिक संस्थेला आर्थिक मदत केली.

वारदोली प्रबळगड येथे कार्यरत असलेली विश्व धर्म सामाजिक संस्था ही अनाथ मुलांना विनामूल्य शिक्षण देत असते. ही संस्था वारकरी सांप्रदाय मधील ह.भ.प. रामयनाचार्य- संजय महाराज पाटील हे चालवत असून ते या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. ह.भ.प रघुनाथ महाराज पाटील हे सुद्धा वारकरी सांप्रदायिक असल्याने त्यांनी काही महिन्यांपूर्वीपासून देशासह राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या आर्थिक परिस्थिला लक्षात घेता त्यांनी आपल्या स्वतःच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अनाथ मुलांनाविणामुल्य शिक्षण देणाऱ्या विश्व धर्म वारकरी सामाजिक संस्थेला आर्थिक मदत केली. ह.भ.प रघुनाथ महाराज पाटील (बोर्ले) यांनी आर्थिक ही विश्व धर्म वारकरी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. रामायणाचार्य- संजय महाराज पाटील( वरदोली प्रबळगड) यांकडे सुपूर्द केली.

अनाथ मुलांना शिक्षणाची गरज असून त्यांना चांगल्या मार्गाला लावण्याचे काम हे ह.भ.प संजय महाराज पाटील हे करत आहेत.अनाथ मुलांना शिक्षणासह वारकरी संप्रदायाची सुद्धा आवड व्हावी यासाठी संजय महाराज हे अथक प्रयत्न करत असतात. परंतु त्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी वारकरी सांप्रदायचे सदस्य तसेच उरण विधान सभा पनवेल तालुका प्रमुख ह.भ.प. रघुनाथ महाराज पाटील हे त्याच्या पाठी खंबीरपणे पाठीशी उभे असतात. अनाथ मुले हे शिक्षण घेऊन चांगल्या मार्गाला लागावे ह्या हेतूने ते आर्थिक मदत करत असतात.

यावेळी ह.भ.प.श्री. रघुनाथ महाराज पाटील हे कट्टर शिवसैनिक आणि शिवसेना उरण विधानसभा पनवेल तालुका प्रमुख असल्याने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ह.भ.प. संजय महाराज पाटील, उरण विधानसभेचे माजी आमदार तथा जिल्हा प्रमुख मनोहरशेठ भोईर, महाड विधानसभेचे आमदार भरतशेठ गोगावले, जिल्हा उपसंघटक परेश पाटील, उपतालुका प्रमुख विष्णू लहाने, विभाग प्रमुख सुधीर पाटील, रामचंद्र मोकळ यांच्यासह शिवसैनिक आणि वारकरी सांप्रदाय मंडळी उपस्थित होते.