• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

सावेळे ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंचपदी सौ. मानसी मोहन फुलावरे यांची बिनविरोध निवड !


कर्जत (भिसेगाव) : सुभाष सोनावणे

कर्जत तालुक्यातील सावेळे ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच पदी मानसी मोहन फुलावरे यांची बुधवार दिनांक १० जून २०२० रोजी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली . सावेळे ग्रामपंचायत सरपंच पद हे एस. टी . प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने अण्णा पांडुरंग कातकरी यांची थेट जनतेमधुन निवड करण्यात आली होती , तर आज उपसरपंच पदाची निवड ग्रामविकास अधिकारी एम .डी .गोसावी यांच्या नियंत्रणाखाली बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडीसाठी शिवसेना माजी कर्जत तालुका प्रमुख श्री.संभाजीशेठ जगताप उपतालुका प्रमुख श्री.बाबूशेठ घारे , माजी सरपंच श्री.मोहन कमलु फुलावरे यांच्या प्रमुख उपस्थितित सौ.मानसी मोहन फुलावरे यांची सावेले ग्रामपंचायत उपसपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली .

या निवडीबद्दल कर्जत - खालापूरचे आमदार महेंद्रशेठ थोरवे, कर्जत खालापुर विधानसभा संघटक संतोषशेठ भोईर, तालुका प्रमुख उत्तमशेठ कोलम्बे ,सरपंच आण्णा कातकरी,मा.उपसपंच मनोज पवार मा.उपसरपंच रमेश मुने,तंटामुक्ती अध्यक्ष अतिष मुने, पो.पाटील धनाजी मुने युवाशाखा अधिकारी निल(आप्पा)मुने , शालेय अध्यक्ष - राजेंद्र फुलावरे(सर) , भास्कर मुने राजेंद्र मुने,संतोष मुने यानी उपसरपंच सौ . मानसी मोहन फुलावरे यांचे अभिनंदन केले . यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते .