- हक्कासाठी आंदोलन
सुरक्षेबाबत खानावले ग्रामपंचायत अग्रेसर असून परिसरात निर्जंतुकीकरण औषध फवारणी

सुरक्षेबाबत खानावले ग्रामपंचायत अग्रेसर असून परिसरात निर्जंतुकीकरण औषध फवारणी
रसायनी : प्रतिक चाळके
देशासह संपूर्ण राज्यामध्ये कोरोना रोगाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत असल्याने पनवेल हद्दीत कोरोना विषाणूचे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पनवेल तालुक्यातील खानावले ग्रामपंचायतीने कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच कोरोना रोगाचे संक्रमण आपल्या विभागात होऊ नये म्हणून टँकरच्या साहाय्याने खानावले ग्रामपंचायत हद्दीतील सर्व गावांमध्ये पाईप द्वारे प्रेशर ने सोडियम हायड्रोक्लोरिक निर्जंतुक औषध फवारणी करून परिसर निर्जंतुकीकरण करून नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले आहे.

परिसर हा निर्जंतुक व्हावा म्हणून सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी हे वेळोवेळी प्रयत्न करीत आहेत. निर्जंतुकीकरणाची फवारणी करत असताना औषध फवारणी ही योग्यरित्या होत असल्याचा आढावा सरपंच कविता पाटील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र पाटील यांच्या सह विभागातील सदस्य यांनी घेतला असून निर्जंतुकीकरण आणि सुरक्षेबाबत खानावले ग्रामपंचायत अग्रेसर असल्याचे दिसून येते.