• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

सामाजिक कार्यकर्ते विजय ठोसर यांची विविध पदावर निवड


चौक : अर्जुन कदम

खालापूर तालुक्यातील तुपगाव येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय ठोसर यांची नुकतीच दोन राज्य कार्यकारणी पदावर निवड झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

तुपगाव येथील विविध क्षेत्रात कार्यरत असलेले विजय उर्फ बंड्या ठोसर यांची राष्ट्रीय ओ.बी.सि.फाउंडेशन च्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाल्याचे नियुक्ती पत्र अध्यक्ष उमेश नालचंद आनेराव यांनी दिले असून ही नियुक्ती ओबीसी जनगणना या समितीवर झाली आहे, सन २०२५ पर्यंत ही निवड आहे. तर दुसऱ्या अखिल गुरव समाज संघटना महाराष्ट्र च्या प्रदेश युवा आघाडीच्या कार्याध्यक्ष पदी झाली आहे.या दोन्ही नियुक्ती मुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विजय ठोसर हे समाज व सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. विभागातील पाणी, वीज  पुरवठा, स्वच्छता अभियान, सामाजिक समस्या, अपघात प्रसंग, आरोग्य, दारूबंदी, तंटामुक्ती साठी सहकार्य करण्यात ते नेहमी अग्रेसर असतात.31 views0 comments
™© Copyright - dont copy this text™