• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

सामाजिक कार्यकर्ते राजेश कुरंगळे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा

सामाजिक कार्यकर्ते राजेश कुरंगळे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा
रसायनी : प्रतिनिधी

पातळगंगा रसायनी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व देवा ग्रुप फाउंडेशन रसायनी विभागाचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य माथाडी आणि जनरल कामगार सेनेचे खालापूर तालुका व रसायनी विभागाचे अध्यक्ष श्री. राजेश बाळाराम कुरंगळे यांचा वाढदिवस दिनांक 26 जुलै रोजी साजरा करण्यात आला.

सध्याचा कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टनसिंगचे पालन करून हा वाढदिवस साजरा करण्यात आला. देवा ग्रुप फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुधीर भाई ढोले (पप्या भाई) व देवा ग्रुपचे महाराष्ट्र राज्य सचिव तानाजी भाऊ मोरे यांच्या कृपाशीर्वादाने हा वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रम राबवण्यात आले होते. परिसरातील माळरानावर वृक्षरोपण तसेच मोहोपाडा येथे शिवभोजन केंद्रावर गोर गरीब गरजूंना विनामूल्य अन्नदान करण्यात आले.


यावेळी परिसरातील गरीब गरजुंना केंद्रात 200 गरिबांना अन्नदान करण्यात आले यावेळी राजेश कुरंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त देवा ग्रुप फाउंडेशनचे रायगड जिल्हाध्यक्ष रविभाऊ सोनावळे, रायगड जिल्हा सचिव कल्पेश चितळे, सामाजिक कार्यकर्ते केवल माळी, सरपंच विजय मुरकुटे, मा. सरपंच अविनाश गाताडे, सामाजिक कार्यकर्ते संजय गव्हाणे, प्रशांत चितळे, रामदास क्षीरसागर, मंगेश चितळे, विशाल चितळे, राजेश सोनावळे, योगेश मुरकुटे, राजेश गायकवाड, अमोल वानखेडे, प्रशांत शिंदे, मयूर चोपडेकर, अनिरुद्ध सोनावळे, जीवन कोरडे यांच्यासह सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी राजेश कुरंगळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

33 views0 comments