• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

सुधागड तालुक्यात अवकाळी वादळी वारा आणि पावसामुळे आदीवासी बांधवांचे लाखोंचे नुकसान


खोपोली : शिवाजी जाधव

२९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या अवकाळी वादळी वाऱ्यासह गाऱ्यांच्या पावसाने सुधागड तालुक्यातील वावंडा आणि कडप्पा ठाकूरवाडीला चांगले झोडपून काढले. या अवकाळी वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसात वावंडा आणि कडप्पा ठाकूरवाडीतील आदिवासी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सुधागड तालुक्यात वावंडा आणि कडप्पा ठाकुरवाडीतील आदिवासी नागरिकांच्या घराचे छप्पर उडून गेल्याने यात कौले, पत्रे यांचे नुकसान होऊन काही घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. तसेच या वादळी वाऱ्याच्या पावसात विद्युत खांब कोसळले असून विद्युत तारा सुद्धा तुटल्याने वावंडा आणि कडप्पा हा डोंगराळ भाग विद्युत खंडित झाला आहे.

यावेळी चंदरगावचे सामाजिक कार्यकर्ते नितीन यादव यांनी ठाकुरवाडीत जाऊन परिस्थितीची पाहणी करून शासनाने या झालेल्या घटनेचा प्रकार लक्षात घेऊन जनजीवन पूर्ववत करावे अशी मागणी केली. तेव्हा चंदरगावचे ग्रामसेवक सचिन केंद्रे यांनी तातडीने सदर आदीवासी वाड्यांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी करून पंचनामा केला. तसेच ठाकुरवाडीतील नुकसान झालेल्या आदिवासी नागरिकांना दिलासा दिला.

25 views0 comments