• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

साथी फाउंडेशन व गोर बंजारा सामाजिक संस्थे मार्फत 300 पेक्षा जास्त लोकांना धान्य वाटप

साथी फाउंडेशन व गोर बंजारा सामाजिक संस्थे मार्फत 300 पेक्षा जास्त लोकांना धान्य वाटप


रसायनी : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर वावेघर रसायनी येथे  2 ग्रुप ग्रामपंचायत सदस्य श्री जगन्नाथ चव्हाण, रवी राठोड, व साहेबाज कसाई, विकी चव्हाण, विजय हिरामण चव्हाण, तेजसिंग राजपूत, सुनील राठोड, निलेश बोटे, राकेश धोत्रे, विलास शिंदे, प्रणय व प्रतीक डाकी, राजेश व रोशन जाधव, इंद्राज कांबळे, रशीद शेख, अम्मू कुरेशी, अमोल माळी, हाजीमिया शेख, सौरभ कसाई यांच्या  एकत्र संकल्पनेतून "साथी फाउंडेशन" तयार केला गेला.

      व वावेघर रसायनी येथील गरजू, विधवा, बिना रेशन कार्डधारक, विकलांग, अशा लोकांना धान्य वाटप करण्यात आला. तसेच  सोबत "गोर बंजारा सामाजिक संस्था-रसायनी " च्या सहकार्याने वावेघर, कष्टकरी नगर , चांभार्ली येथील बंजारा समाजाच्या गरजू व विधवा लोकाना धान्य वाटप करण्यात आला आता पर्यंत 300 हुन अधिक लोकांना मदत करण्यात आली.          या संस्थेच्या मदतीस माजी सरपंच सावळे डॉ. श्री अविनाश गाताडे, समाजसेवक श्रीरंग काणे, डॉ. मिलिंद भगत, डॉ. धीरज जैन, डॉ. पाठक, ऑल इंडिया बंजारा सेवा संघ,व  श्री राजू गोविंद राठोड देवासारखे धावून आले.


32 views0 comments