• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

सुचना व प्रसारण राज्यमंत्री प्रकाश जावळेकर यांना 'क' श्रेणीतील वृत्तपत्रांना विशेष पॅकेजची मागणी

पुरोगामी पत्रकार संघाकडून सूचना व प्रसारण राज्यमंत्री प्रकाश जावळेकर यांना 'क' वर्ग श्रेणीतील वृत्तपत्रांना विशेष पॅकेज मागणी चे निवेदन

ह.आंदोलन : प्रतिनिधी

देशासह राज्यात कोरोना विषाणूचा वैश्विक संकट आले आहे. या संकटाने महाराष्ट्राला मोठा फटका बसल्याने या लढाईला केंद्रसरकार आणि राज्यसरकार हे दोन हात करत असून सर्वत्र ठिकाणी लॉकडाउन पुकारण्यात आलेला आहे.

या लॉकडाउनच्या काळात 'क' वर्ग श्रेणीतील वृत्तपत्र हे भरडले गेले असून सुद्धा कोरोना विषाणूच्या काळात जनजागृतीचे मोठे काम हे करत आहेत. वितरणाचा आवाका हा जिल्ह्यापुरता मर्यादित असल्याने 'क' वर्ग श्रेणीतील वृत्तपत्रांनी आपले वितरण हे स्टॉलच्या माध्यमातून तसेच ई- पेपर आणि वेबसाईटच्या माध्यमातून जनतेमध्ये जनजागृती करत सुरु ठेवले आहे.

याकाळात शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जाहिराती तसेच इतर व्यावसायिक जाहिराती बंद झाल्याने वृत्तपत्रांची अवस्था अत्यंत वाईट झालेली असल्याने वृत्तपत्रांची आर्थिकदृष्ट्या कोंडी झालेली आहे.

तसेच वृत्तपत्र छापखान्यातील कागद आणि शाई वर जी.एस.टी आकारण्यात येत असल्याने त्याचा फटका वृत्तपत्रसृष्टीला बसू शकतो. या पार्श्वभूमीवर छापखान्यातील कागद आणि शाई यांवरील जी.एस.टी रद्द करून तसेच मागील वर्षी करण्यात आलेली पडताळणी रद्द करून 'क' वर्गातील सर्व वृत्तपत्रांना सरसकट ५० रुपये दर देण्यात यावा. असा उल्लेख दिलेल्या पत्रकाद्वारे करण्यात आला आहे. लॉकडाउनच्या काळात अनेक वृत्तपत्र हे जाहिराती अभावी बंद असल्याने वृत्तपत्रांची अवस्था ही मरणासन्न झालेली दिसून येत आहे. त्यामुळे विशेष बाब म्हणून जी वृत्तपत्रे लॉकडाउन काळातही पेपरस्टॉल, ई-पेपर, वेबसाईड या माध्यमातून नियमित प्रसिद्ध झालेली आहेत अश्या वृत्तपत्रांना ५ लाख रुपये विशेष पॅकेज देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त पुरोगामी पत्रकार संघ रजि.क्र. महा/२१३/२०१७/ रायगड यांच्याद्वारे सूचना व प्रसारण राज्यमंत्री प्रकाश जावळेकर यांच्याकडे पत्राद्वारे निवेदन देण्यात आले.


™© Copyright - dont copy this text™