• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

सलून दुकाने चालू करण्यासाठी नाभिक संघ रस्त्यावर , रविवार नंतर तीव्र आंदोलन !


कर्जत (भिसेगाव) : सुभाष सोनावणे

छत्रपतींच्या काळापासून बारा बलुतेदारांपैकी नाभिक समाज आजपर्यंत हातावर कमावणारा व आपले कुटुंब सांभाळणारा समाज , मात्र कोरोना विषाणू महामारीच्या काळात २२ मार्च ते आजपर्यंत सलून दुकाने बंद ठेवून शासन प्रशासनाला सहकार्य केले परंतु लॉकडाऊन शिथिल केल्यावर शासनाने सर्व व्यापारी वर्गास दुकाने चालू करण्याची परवानगी दिली असताना कर्जत तालुक्यात नाभिक समाजाची सलून दुकाने उघडण्यास शासनाने परवानगी दिली नसल्याने कुटुंबावर आता उपासमारीची वेळ आली असल्याने सर्व वीर हुतात्मा भाई कोतवाल संघ व कर्जत तालुका नाभिक समाज रस्त्यावर उतरला असून त्यांनी रविवारनंतर आम्ही आमची दुकाने उघडणारच , आमच्यावर कारवाई करा , असा ईशारा शासनाला दिला असून कर्जत तालुक्यातील वातावरण चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही .

पाचवा लॉकडाऊन संपायला आला तरी कर्जत तालुक्यातील सलून दुकाने चालू करण्याची परवानगी जिल्हा प्रशासन देत नसल्याने केश कर्तनालय दुकानंदारांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खुपच भयावक झाली आहे . उपासमारीची वेळ आली असल्याने व कर्जबाजारी झाल्याने कर्जत तहसीलदार यांना वेळोवेळी तोंडी - लेखी निवेदन देऊनही परवानगी नाकारण्यात येतेे , इतर तालुक्यात सलून दुकाने चालू झाली असताना येथील दुकानावर हा अन्याय का , असा सवाल करत कर्जत तालुका नाभिक समाज रस्त्यावर उतरला . त्यांनी आज कर्जत तहसिल कार्यालयावर शासनाचे आदेश पाळत धडक देऊन उद्याच दुकाने उघडणार असा इशारा दिला , मात्र नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी दोन दिवस थांबा , असे आश्वासन दिल्यावर रविवार नंतर दुकाने उघडणारच , भले मग आमच्यावर कारवाई झाली तरी चालेल , असा इशारा निवेदन देताना दिला आहे .

यावेळी ऍड. गोपाळ शेळके यांच्या नेतृत्वाखाली , रघुनाथ विभार - ता . सचिव , अध्यक्ष - राकेश डगले , उपाध्यक्ष - कृष्णा पवार , सचिव - विशाल कोकरे , खजिनदार - भरत पवार , रुपेश क्षीरसागर , सुनील आढाव ,विनायक गायकवाड , गणेश गायकवाड , मयुर पवार , इरफान खलिफा , दिनेश मंडलीक , रवि सविते , रुपेश सेन , सागर मंडलीक , सचिन करेकर , नितीन गायकवाड , मछिंद्र पवार , राहुल गायकवाड , त्याचप्रमाणे तालुक्यातील नाभिक समाज बंधू , सलून दुकानदार बहुसंख्य प्रमाणात उपस्थित होते . यामुळे तालुक्यातील वातावरण चिघळणार का , याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे .

11 views0 comments

Recent Posts

See All

महाराष्ट्रात उद्यापासून रात्रीची संचारबंदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय

🎤 *_सम्राट मराठी LIVE_* 🌐 ⏩ *ब्रेकिंग न्यूज* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ _*महाराष्ट्रात उद्यापासून रात्रीची संचारबंदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय.*_ https://youtu.be/122_BuNRwTA 👆🏻 *बातमी पाहण्यासाठ