• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

सम्यक सामाजिक संस्थेतर्फे मा. सरपंच संदिप मुंढे यांच्याकडे करण्यात आलेली मागणी त्वरित पूर्ण

Updated: May 22, 2020


ह. आंदोलन : प्रतिनिधी

सम्यक सामाजिक संघटनेच्या वतीने मोहोपाडा येथील शिक्षक वसाहतीमधील विहिरीची व बैठक हॉल शेजारील गटारे यांची दुरावस्था सुधारण्यात यावी यासाठी मा.सरपंच संदिप मुंढे यांच्याकडे मागणी केली होती. व ते काम स्वखर्चाने तात्काळ मार्गी लावत संदिप मुंढे यांनी वासंबे ग्रामपंचायतच्या सहकार्याने पार पडल्याने परिसरातील शिक्षकवर्ग, आणि रहिवास्यांनी त्यांचे आभार मानले.

सम्यक सामाजिक संघटनेचे अध्यक्ष तसेच जेष्ठ समाजसेवक प्रकाशशेठ गायकवाड आणि सम्यक सामाजिक संस्थेचे खजिनदार सुनिल निकाडे यांनी मोहोपाडा येथील शिक्षक वसाहती मधील विहिरीमध्ये साचलेला कचरा, गाळ, घाणपाण्याचा निचरा, विहिरी जवळील साफ सफाई तसेच विहिरीवरील झाकण बसवून देण्याबाबत आणि बैठक हॉल शेजारील सांडपाणी वाहून नेणारे गटार रुंद करून सुस्थितीत करण्याची मा.सरपंच संदिप मुंढे यांच्याकडे मागणी केली होती.

मा. सरपंच संदिप मुंढे व पी.एन. काळे यांनी सम्यक सामाजिक संस्थेने केलेल्या मागणीची शहानिशा डॉ.पळणीटकर, सुनिल निकाडे, ऍड. सचिन चाळके, बाळासाहेब सावर्डे, चिंतामण ठाकरे, अवधूत परांजपे, डॉ. म्हशीलकर, राजू पाटील, रुपेश केसरकर यांच्या समक्ष करून केली.

मा. सरपंच संदीप मुंढे आणि पी.एन. काळे यांनी पाहणी केली असता सरपंच ताई पवार, अजय सोनावणे, कपिल शहा, सचिन यांना कामाची रूपरेषा सांगून कामाला गती देत सम्यक सामाजिक संस्थेद्वारे विनंतीपूर्वक केलेली मागणी पूर्ण केली. याबाबत सम्यक सामाजिक संस्थेकडून तसेच शिक्षक, रहिवाशी आणि नागरिकांकडून मा. सरपंच संदीप मुंढे यांचे आभार मानण्यात आले.


--------------------------------------------------------------------

मा.सरपंच संदिप मुंढे यांनी सम्यक सामाजिक संस्थेच्या मागणीची तात्काळ दखल घेत काम हाती घेऊन बऱ्याच दिवसांपासून रखडलेले काम पुर्ण केल्याबद्दल परिसरातील शिक्षक रहिवासी आणि सम्यक सामाजिक संस्थेतर्फे श्री. संदिप मुंढे यांचे मनपूर्वक आभार.

श्री. सुनिल निकाडे

खजिनदार : सम्यक सामाजिक संस्था, रीस-रसायनी