• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

समाजसेवक प्रकाशशेठ गायकवाड यांनी जपली सामाजिक बांधिलकी

समाजसेवक प्रकाशशेठ गायकवाड यांनी जपली सामाजिक बांधिलकी..

गरीब गरजू नागरीकांना किराणा सामानाचे वाटप

मोहोपाडा : गौतम सोनावणे

कोरोना विषाणूचे संक्रमण होऊ नये म्हणून देशासह महाराष्ट्रात लॉक डाऊन परिस्थिती आहे. मोहोपाडा व रसायनी परिसरात शासनाच्या लॉक डाऊनलोड ला नागरिक प्रतिसाद देत असून गोरगरीब व रोजंदारीवर काम करणाऱ्यांची उपासमार टाळण्यासाठी सम्यक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश गायकवाड यांनी सामाजिक बांधिलकी जपत मोहोपाडा परिसरातील 20 गरजू - गरीब, निराधार, विधवा महिला व रोजंदारीवर काम करणाऱ्यांना किराणा सामान देऊन मदतीचा हात दिला आहे.

गेले काही दिवसांपासून हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांची अवस्था गंभीर झाली होती. रोजगार नसल्यामुळे पोटाची खळगी भरायची हा प्रश्न असताना समाजसेवक प्रकाशशेठ गायकवाड यांनी कमीत कमी15 दिवस पुरेल इतके किराणा सामान गरीब व गरजू नागरिकांना दान स्वरूपात दिले. तसेच हे कार्य स्वखर्चाने केले याबद्दल त्यांचे नागरिकांनी आभार व्यक्त केले. त्यांच्या या सामाजिक कार्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून यावेळी प्रकाशशेठ म्हणाले कि अशा प्रकारची मदत करा ज्यांना खरंच मदतीची गरज आहे आणि त्यांना करणे आवश्यक आहे. यावेळी रसायनी पोलीस ठाण्याचे सब पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.