• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

सभापती वृषाली पाटील यांच्यावतीने मोहोपाड्यात अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांना सुरक्षा साहित्य वाटप..

सभापती वृषाली पाटील यांच्यावतीने मोहोपाडा बाजारपेठेत अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांना फेस शिल्ड, सॅनिटायझर व मास्कचे वाटप


रसायनी : राकेश खराडे

रसायनी पाताळगंगा परीसराची मुख्य बाजारपेठ असणा-या मोहोपाडा नविन पोसरी बाजारपेठेत सभापती वृषाली पाटील व ज्ञानेश्वर जनार्दन पाटील या दांपत्याच्यावतीने कोरोना (कोविड-१९) पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या दुकानदारांना फेस शिल्ड, सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले.यावेली अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या बाजारपेठेतील मेडिकल,भाजी विक्रेते, किराणा माल विक्रेते,मटण,चिकन विक्रेते अशा दुकानदारांना सर्वांना अधिक सुरक्षित संपूर्ण चेहरा झाकला जाईल अशा फेस शिल्डचे वाटप करण्यात आले.तसेच कोरोना विषाणुपासून संरक्षण व्हावे यासाठी सॅनिटायझर व प्लॅस्टीक मास्कचे वाटप केले.

मोहोपाडा नविन पोसरीतील अत्यावश्यक सेवा पुरविणारा व्यापारी बांधव ग्रामपंचायत, आरोग्य अधिकारी व पोलिस प्रशासन यांच्या खांद्याला खांदा लावून कोरोनाच्या लढाईत सहभाग नोंदवत आहेत.परीसरातील व्यापा-यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सभापती वृषाली पाटील व ज्ञानेश्वर जनार्दन पाटील यांनी फेस शिल्ड,सॅनिटायझर व मास्कचे वाटप स्वखर्चांने केल्याचे ज्ञानेश्वर पाटील यांनी सांगितले.यावेली व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदिप पाटील, उपाध्यक्ष मनोज सोमाणी, सचिव अमित शहा आदी उपस्थित होते.

24 views0 comments
™© Copyright - dont copy this text™