• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

सफर सहयाद्री ट्रेकर्स मार्फत राजमाची उधेवाडीला आर्थिक मदत


चौक : रोहिदास ठोंबरे

मावळ तालुक्यातील डोंगरपायथ्याला वसलेल्या राजमाची उधेवाडी गावाला निसर्ग चक्रीवादळाने घरांसह चीजवस्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळी पावसात उधेवाडी गावातील २३ घरांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.

जोरदार चक्रीवादळाच्याकारणाने काही घरे जमीनदोस्त झाली तर काही घरांची छपरे उडून गेली आहेत.याशिवाय अन्नधान्याचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याने सर्वांचे संसार उघड्यावर आले आहेत.या अनुषंगाने मुंबई येथील सफर सहयाद्री ट्रेकर्स या संस्थेच्या वतीने या सर्व कुटुंबातील व्यक्तींना आर्थिक मदत व्हावी म्हणून एक हात मदतीचा दिला आहे.

सफरच्या माध्यमातून जमा झालेल्या मदतीतून ८ कुटूंबाना आर्थिक स्वरूपात प्रत्येकी ३०००/- मदत थेट कुटूंबप्रमुखाच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली.तर Maha Adventure council (MAC) या संस्थेकडून राजमाची उधेवाडीसाठी लागणारे घरावरील पत्रे व घरबांधणी साहित्य यासाठी रुपये १०,०००/-ची मदत करण्यात आली आहे.या मदत कार्याचे सर्वच थरांकडून कौतुक होत आहेत आणि प्रत्येकाने पुढे येऊन एक हात मदतीचा म्हणून सफर सहयाद्री ट्रेकर्स कडून आवाहन करण्यात येत आहे.