• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

शाह सतनाम आश्रम कडून पूर्ण ग्रामपंचायत सॅनिटायझर

चौक : अर्जुन कदम

तीन दिवसांच्या लॉकडाऊन मध्ये ग्रुप ग्रामपंचायत कलोते हद्दीतील सर्व गावे व वाड्या शाह सतनामसिंग जी परम सुख आश्रम यांच्याकडून सॅनिटायझर करण्यात आल्या.

कोरोना या संसर्गजन्य विषाणू रोगामुळे आपला परिसर निर्जंतुक असावा म्हणून कलोते ग्रामपंचायत यांनी डेरा सच सौदा सिरसा(रजि) हरियाणा यांना पत्र देऊन ट्रॅकटर व मशिनरी देण्याची विनंती करून फवारणी करण्यासाठी कळविले होते.ग्रामपंचायत च्या विनंती ला मान देऊन कलोते येथील शाह सतनाम सिंग जी परम सुख आश्रम या त्यांच्या शाखेच्या बंता व त्याच्या तीन सहकाऱ्यांनी ट्रॅकटर व मशनरी घेऊन कलोते हद्दीतील चार गावे व सहा वाड्या मधून क्लोरीवॅट ची फवारणी ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या मदतीने तीन दिवसात पूर्ण केली. औषध व डिझेल ग्रामपंचायत यांनी उपलब्ध करून दिले होते.ग्रामपंचायत कलोते यांनी तीन दिवस जनता कर्फ्यु केला होता. त्याचदरम्यान ही फवारणी केली. यासाठी सरपंच रेश्मा ठोंबरे, ग्रामसेवक प्रेमसिंग गिरासे, उपसरपंच यशवन्त धारपवार, बळीराम ठोंबरे, सुनील गायकवाड, यशवन्त ठोंबरे, जग्गु शेट्ये, अरुण रामधरणे, संदीप जाधव व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.

(फवारणी करताना बंता व त्याचे सहकारी, छाया-अर्जुन कदम)