• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

शिवस्वराज्य प्रतिष्ठान कडून फेसशिल्ड वाटप


चौक : अर्जुन कदम

कोरोना युद्धातील योद्ध्यांना शिवस्वराज्य प्रतिष्ठान चौक यांच्यातर्फे फेसशिल्ड चे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली.

कोरोना या संसर्गजन्य महामारीने जगभरात थैमान घातले आहे,अनेकांनी आपले प्राणही गमावले आहेत,जगभरात पसरलेला कोरोना हा आता ग्रामीण भागात पाय पसरवत असल्याचे सिद्ध झाले आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्यसेवा व ग्रामपंचायत विभाग कार्यरत झाला असून हे कर्मचारी जोखमीचे काम करीत आहेत.त्यांना सुरक्षितता देण्यासाठी चौक येथील शिवस्वराज्य प्रतिष्ठान सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीने चौक ग्रामपंचायत कर्मचारी,सफाई कामगार,आरोग्य कर्मचारी,अंगणवाडी सेविका,मदतनीस,आशा वर्कर,ग्रामविकास अधिकारी,स्वयंसेविका यांनापूर्ण चेहरा झाकेलं असे फेसशिल्ड देण्यात आल्याने विशेषतः साफसफाई व आरोग्यसेवा देणारे यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव निर्माण झाले आहेत.यावेळी सोशल डिस्टन्स ठेऊन वाटप करण्यात आले.राज्य सरकार अपयशी ठरले नसून कटकारस्थान करणारे आरोप करीत आहेत,आम्ही सरकारच्या पाठीशी असून शिवसेनेच्या माध्यमातून कोरोना विरोधातील लढाई जिंकू असे युवानेते निखिल मालुसरे यांनी सांगून भाजप चा निषेध केला.

46 views0 comments