• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

शिवसेनेचे माजी आमदार माननीय मनोहर शेठ भोईर यांच्या वाढदिवसा निमित्ताने गरजूंना धान्य वाटप


आंदोलन : व्ही.व्ही.जी

भारतामध्ये 22 मार्च पासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्र व महाराष्ट्र सरकार यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉक डाऊनची घोषणा केलेली आहे.

त्यामुळे अनेक गोरगरिबांचे रोजगार बुडाले आहेत. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना माझा वाढदिवस साजरा करताना होणारा खर्च न करता त्याच खर्चामधून गोरगरिबांना मदतीचा हात द्यावा असे आवाहन केले.

त्यामुळे मा.आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या वतीने आणि शिवसेना शाखेच्या वतीने रिक्षावाले व गोरगरीब कुटुंब असे शंभर कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी समाधान व्यक्त केले.

त्यामुळे समाजातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

यावेळी वावेघर ग्रामपंचायतीचे सदस्य व शिवसेना गुळसुंदे विभाग प्रमुख ज्ञानेश्वर माळी, वावेघर शाखाप्रमुख अमित माळी, उप शाखाप्रमुख विलास पाटील, युवा प्रमुख महेंद्र माळी, प्रशांत माळी, शुभम माळी, विजय माळी, माजी शाखा प्रमुख नरेश चौधरी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

48 views0 comments