• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

शिवभोजन थाळी ठरणार भविष्यातील गोरंगरिबांसाठी उपजीविकेचे केंद्र

शिवभोजन थाळी ठरणार भविष्यातील गोरंगरिबांसाठी उपजीविकेचे केंद्र , भिसेगावात आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या हस्ते उदघाटन !

कर्जत (भिसेगाव) : सुभाष सोनावणे -

कर्जत तालुक्याबरोबरच शहरात देखील गोरगरीब , गरजू , कामगार , आदिवासी , अर्धपोटी रहाणा-या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे . दिवसभर काबाडकष्ट करून हातावर कमावून आपल्या कुटुंबाची पोटाची खळगी भरून दिवस काढतात. असे कुटुंब कोरोना विषाणू संसर्ग महामारीत जे दिवस काढले तसे दिवस भविष्यात कुणावर येऊ नयेत , म्हणून कर्जत खालापुरचे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी या पार्श्वभूमीवर सर्वत्र शिवभोजन थाळी केंद्र उघडून शिवशाहीचे ८० टक्के समाजसेवा हे धोरण या कोरोना विषाणूच्या स्मशानकळा पसरलेल्या काळात अवलंबून भिसेगाव येथे शिवभोजन थाळीचे उदघाटन करण्यात आले.

कोरोना महामारीत दररोजच्या उदरनिर्वाहाची साधने बंद पडली आहेत.कामाअभावी पैसे नसल्याने गोरगरिबांची उपासमारी होऊ नये याकरता यापूर्वीच ठरवल्याप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील शिवभोजन थाळी जी गोरंगरिबांसाठी उपजीविकेचे केंद्र या काळात व भविष्यात ठरणार आहे . शिवभोजन थाळी योजना ही राज्यातील गोरगरीब नागरिकांसाठी कमी दरात जेवण देणारी सरकारची अत्यंत महत्त्वकांक्षी योजना आहे.

कर्जत नगरपरिषद हद्दीतील गोरगरीब जनतेची उपासमार होऊ नये याकरता भिसेगाव रेल्वे गेट येथे शिवभोजन थाळी केंद्राचे उदघाटन आमदार महेंद्रशेट थोरवे यांच्या शुभहस्ते करण्यात आले , यावेळी महिला जिल्हा अध्यक्षा सौ . रेखाताई ठाकरे , विधानसभा संघटिका सौ . नीलमताई चोरगे, कर्जत नगरपरिषदेचे नगरसेवक संकेत भासे , कर्जत पंचायत समिती सभापती सौ . सुजाता ताई मनवे,माजी नगरसेविका यमुनाताई विचारे, माजी नगरसेवक बाळाजी विचारे , विभाग प्रमुख गणेश पालकर , सुरेखाताई शितोळे, शहर संघटक शहासने ताई आदी तसेच शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते .