• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

श्री समर्थ संस्था व सिप्ला यांच्या विद्यमाने HIV रुग्ण व अनाथ महिला यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..

श्री समर्थ संस्था व सिप्ला फाउंडेशन यांच्या विद्यमाने HIV बाधित रुग्ण व अनाथ महिला यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

आंदोलन : व्ही.व्ही.जी संपूर्ण जगात व आपल्या देशात कोरोना महामारिने थैमान घातले असताना अनेकांचे रोजगार बुडाल्याने उपसमारीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कुणी उपाशी राहू नये म्हणून समर्थ संस्था व सिप्ला फाउंडेशन यांच्या वतीने श्री समर्थ संस्था कार्य करत असलेल्या गरजू एच.आय.व्ही.बाधित रुग्ण व अनाथ महिला अशा 100 जनांना जीवनावश्यक वस्तुंच पॅकेट वाटण्यात आली तेव्हा लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. या वेळी श्री समर्थ संस्थेचे अध्यक्ष अरविंद पाटील म्हणाले की, या संकट समई संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.

यावेळी आम्ही गरजूंना ज्या आवश्यक वस्तू लागतील त्या आम्ही पुरवण्याचे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच आम्ही या आधीपण कोरोना विषयीची जनजागृती व घ्यावयाची खबारदरी याबाबतची माहिती पत्रके व मास्क वाटून केली आहे. व गरजूंना यापुढेही मदत करत राहू असे सांगितले.