• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

श्रीरामनगर येथे महिला पोलिसांचे घर जळून खाक


पाताळगंगा : काशिनाथ जाधव

१६ जून ,नगरपालिका हद्दीतील श्रीरामनगर येथे ब्राह्माडेश्वरी सोसायटी इमारतीमधील तळमजल्यावरील श्रद्धा संतोष लोखंडे या महिला पोलिसांच्या फ्लॅटला अचानक आग लागली. परिसरातील रहिवाशांनी व अग्निशामक दलाने शर्तीचे प्रयत्न करून आग विझवली. सदरची घटना सकाळी ८. ३० च्या दरम्यान घडली. आगीचे कारण अद्याप समजले नाही. 

         श्रद्धा संतोष लोखंडे या महिला पोलीस सकाळी ८. १५ च्या दरम्यान अंबरनाथ येथे ड्युटीवर घरून निघाल्या,त्या केळवली येथे पोहोचल्या असतानाच शेजाऱ्यांनी त्यांना त्यांच्या फ्लॅटला आग लागल्याचा भ्रमणध्वनी केला. त्याचवेळी त्यांचे पती व मुले घरात नव्हते. ते खोपोलीत गेले होते असे स्थानिकांकडून समजते. इमारतीमधील व शेजारील रहिवाशांनी आग लागताच विझविण्याचा प्रयत्न केला त्यानंतर खोपोली अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. काही वेळात आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले पण तोपर्यंत घरातील सर्व वस्तू जळून कोळसा झाला होता. 

   श्रद्धा लोखंडे यांच्या फ्लॅटमधील सर्व वस्तू जळून खाक झाल्या.