- हक्कासाठी आंदोलन
विहिर तळ गाठण्याच्या तयारीत, जलाशय कोरडे पडत असल्यामुळे, पाणी टंचाईच्या झळा झाल्या असह्य...
विहिर तळ गाठण्याच्या तयारीत, जलाशय कोरडे पडत असल्यामुळे, पाणी टंचाईच्या झळा झाल्या असह्य...

फोटो : विहिरीची पातळी खोलवर गेलेली पहावयास मिळत आहे. ( छाया : काशिनाथ जाधव,पाताळगंगा )
काशिनाथ जाधव : प्रतिनिधी पाताळगंगा :२५ एप्रिल , दिवसेंदिवस दिवस पिण्यांच्या पाण्यांचे संकट गडद होत चालले असताना,कोरोना मुळे शाळेला सुट्ट्या पडल्या असल्यामुळे विद्यार्थ्यांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.सकाळ असो किंवा दुपार मिळेल त्या वेळेला अनेक महीला वर्ग पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.कारण पाण्याला जिवन असे म्हटले जाते.पाण्याशिवाय पशु ,पक्षी जिवंत राहु शकत नाही.यामुळे सध्या पाणी टंचाई ची झळा असह्य होत असल्यांची जाणीव महीला वर्गांना होत आहे.
उन्हाळ्यांची चाहूल लागताच बहुतेक पाण्यांचे असलेले स्त्रोत्र जवळ जवळ तळ गाठण्यांच्या मार्गावर असताना.पाण्यांचे संकट अधिक गडद होत चालले असताना पिण्यांच्या पाण्यांच्या प्रश्न गंभीर निर्माण होत असल्यांची चाहून नागरिकांना जाणवू लागली आहे.मात्र काही ठीकांणी डोंगरांच्या जवळ असलेले तुरळक झ-या च्या माध्यमातून निर्माण होणारे पाणी याच पाण्यावरती काही अदिवासी समाज हेच पाणी पिवून आपली तृष्णा शांत करीत असतात. मात्र ग्रामीण भागात पाण्यासाठी विहीर,तळाव,कुपनलीका असते मात्र रणरणत्या उन्हामुळे या स्त्रोत्रांची पाण्यांची घट निर्माण झाली आहे.यामुळे अनेकांना टँकरचा अधार घ्यावा लागत आहे.मात्र अजुनही पाउस पडण्यांस दिड महीन्यांचा काळावधी असताना या पाण्यांच्या झळा सर्वांना सहन कराव्या लागत आहे.यामुळे शाळेय विद्यार्थ्यांना रणरणत्या उन्हामध्ये सुद्धा आपल्या पाणी कसे मिळेल हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवले जात आहे.पाणी टंचाईने उग्र रुप धारण केल्यामुळे टंचाईच्या झळा विद्यार्थी समवेत महिलावर्गांस सोसावी लागत आहे.