• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

वासांबे जि.प. विभागात २१० पिपिई किट पंचायत समितीतर्फे वाटप


आंदोलन : प्रतिनिधी

कोरोनामुळे जागतिक पातळीवर हाहाकार माजल्याने संपूर्ण भारताला सुद्धा या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे केंद्र व राज्य सरकारला नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी लॉकडाऊनचे शस्त्र बचावात्मक म्हणून वापरात आणावे लागत आहे. परंतु 40 दिवसांच्या लॉकडाऊनला शिथिल करत नागरिकांसाठी गरजेच्या वस्तूंची दुकाने खुली करून दिली. आणि चाकरमान्यांना देखील कामानिमित्त बाहेर कारखान्यांपर्यंतचा प्रवास मोकळा करून दिला. याचाच परिणाम म्हणून रसायनीत कोरोना रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे.

हि वाढत चाललेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी माजी सभापती कांचन पारंगे यांच्या सहकार्याने वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या सभागृहात पिपिई किट परीसरातील ग्रामपंचायत स्वच्छता कर्मंचारी, डाॅक्टर, रुग्णवाहिका चालक आदींना पंचायत समिती सभापती वृषाली पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वाटप करण्यात आले.

पंचायत समिती सेस निधीतून २१० पि.पि.ई किटचे वाटप वासांबे जिल्हा परिषद विभागातील वासांबे, चांभार्ली व लोधिवली ग्रामपंचायत हद्दीतील स्वच्छता कर्मचारी तसेच रसायनी पाताळगंगा परीसरातील प्रायमा डॉक्टर असोसिएशन व रुग्णवाहिका चालक यांना करण्यात आले.

रसायनीत कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना म्हणून या पिपिई किटचे वाटप केले असल्याचे सभापती वृषाली पाटील व माजी सभापती कांचन पारंगे यांनी यावेळी मत व्यक्त केले.

तसेच पंचायत समितीच्या वतीने जंतुनाशक फवारणी टँकर वासांबे ग्रामपंचायतीला मिळाल्याने या वाहनाचा परिसरात वेळोवेळी वापर होताना दिसत आहे.

या पी.पी.ई किटच्या वाटपप्रसंगी वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच ताईं पुंडलिक पवार, माजी सरपंच कृष्णा पारंगे, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नाना म्हात्रे, निखील डवळे, संतोष चौधरी, ग्रामपंचायत सदस्य श्वेता कांबळे, माधुरी जांभळे, सिध्दी कुरंगळे, भालचंद्र राऊत, समीर म्हात्रे, श्याम म्हस्कर, उत्तम माळी, ग्रामपंचायत कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.