• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

वासंबे ग्रामपंचायतीचा भाजी विक्रेत्यांना आधार


वासंबे ग्रामपंचायतीचा भाजी विक्रेत्यांना आधार


रसायनी : प्रतिक चाळके

देशासह राज्यात कोरोना विषाणू (कोव्हीड-१९) रोगाचा प्रदूर्भाव हा रोखण्यासाठी प्रशासन अथक प्रयत्न करत आहेत. रायगड जिल्हा हा ऑरेंज झोनमध्ये असला तरीही कोरोना रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता रायगड जिल्ह्यामधील उरण आणि पनवेल तालुका हे रेड झोनमध्ये आहेत. रसायनी परिसर हा पनवेल पासून १४-१५ किलोमीटर अंतरावर असल्याने रसायनी परिसरात मोहोपाडा येथे मोठी बाजारपेठही भरत असते. रायगड जिल्हा ऑरेंज झोन झाल्यापासून मोहोपाडा बाजारपेठेत नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. बाजारपेठेमध्ये जास्त गर्दी होऊ नये तसेच कोरोना रोगाचा प्रादुर्भाव हा रसायनी परिसरात होऊ नये म्हणून वासंबे ग्रामपंचायतीने भाजी विक्रेत्यांसाठी अचानक ग्राउंड हा पर्याय निवडला आहे. अचानक ग्राउंडवर भर उन्हात भाजी विक्रेते हे भाजी विकत होते. व भाजी खरेदीसाठी आलेले नागरिक सुद्धा उन्हात भाजी खरेदी करत असल्यामुळे वासंबे ग्रामपंचायतीने भाजी विक्रेत्यांसाठी ग्रीन नेट लावून तसेच सोशल डिस्टन्स प्रमाणे जागा करून दिल्याने भाजी विक्रेत्यांना रोजगार मिळणार असल्याने वासंबे ग्रामपंचायतीकडून एक आधार मिळाला असल्याचे दिसून येत आहे.