- हक्कासाठी आंदोलन
विवाहित महिला बेपत्ता
विवाहित महिला बेपत्ता

रसायनी : राकेश खराडे
करंजाडे येथील सरस्वती सदन सोसायटीत राहणारी सौ. सारिका जगदीश कोली (वय ३०)ही राहत्या घरातून कोणासही काही न सांगता कोठेतरी निघून गेली आहे. याबाबत तिचे पती जगदीश बुधाजी कोली (वय ३३) यांनी पोलिसांत हरविल्याची तक्रार केली आहे. तिचे पती जगदीश बुधाजी कोली हे नातेवाईंकांच्या अंत्यविधी करीता बाहेर गेले असता तिची मुले घरातच ठेवून कोणास काहीएक न सांगता सारिका राहत्या घरातून निघून गेली आहे. याबाबत विश्र्वसनीय माहितीनुसार सारिका जगदिश कोली (वय ३०) या उंची ४ फुट ३ इंच, रंग गोरा, अंगाने मध्यम, नाकात नथ, गल्यात गंठण, अंगात पंजाबी ड्रेस, पिवल्या रंगाचा कुडता सलवार, लाल रंगाची ओढणी, पायात पैजण व सॅण्डल ही विवाहित महिला बेपत्ता झाली असून कोणासही कुठेही आढलल्यास पनवेल शहर पोलिस ठाण्याशी संपर्कं करावा अथवा सागर शिर्के (मो.9702983229), सचिन शिर्के (मो.8692828410)यांच्याशी संपर्क साधावा ,असे आवाहन करण्यात आले आहे.