• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

विवाहसोहळ्याचा खर्च वाचवून वधुवरांकडून गोरगरीबांना कपडे व जिवनावश्यक वस्तूंचे वाटप..

विवाहसोहळ्याचा खर्च वाचवून वधुवरांकडून गोरगरीबांना कपडे व जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करुन समाजासमोर आदर्श!

रसायनी : राकेश खराडे

कोरोना (कोविड १९)या विषाणुच्या संसर्गांमुले संपूर्ण देश भितीच्या वातावरणात आहे.यातच राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर आदी मुख्य शहरांत कोरोनाबाधित रुग्णसंख्येचा आलेख चढता असल्याचे पहावयास मिळत आहे.लाॅकडाऊनचा तिसरा टप्पा सतरा मे-पर्यंत सुरू आहे. लाॅकडाऊनमुळे रोजंदारीवर पोट भरणा-या गरजू गोरगरीबांची अवस्था बिकट झाली असून दोरी तुटलेल्या पतंगासारखी होवून बसली आहे. कोरोना पार्श्वभूमीवर विवाह सोहळ्यावरही बंधन आल्याने गर्दी न करता ठराविक नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत आहे. कसळखंड येथील धन्वंती घरत आणि रोहिदास जुनघरे यांचा विवाह सोहळा अगदी साध्यापध्दतीने गर्दी न करता सोशल डिस्टिंक्शनचे पालन करुन करण्यात आला.हा विवाहसोहळा भटजी विकास जोशी यांच्या मंगलाष्टकांनी पार पडला. यावेळी सरपंच माधुरी पाटील,माजी प्रभारी सरपंच अनिल पाटील, उपसरपंच रोहित घरत, तंटामुक्ती अध्यक्ष वसंत पाटील, प्रगतशील शेतकरी कमलाकर घरत, पोलिस पाटील प्रविण पाटील,माजी उपसरपंच बबन पाटील, ग्रामसेवक वारे, ग्रामपंचायत सदस्या राजश्री घरत, रंजना नाईक आदी उपस्थित होते.

यावेळी वधुवरांच्याहस्ते आसपासच्या परिसरातील आदीवासी गोरगरीब बांधवांना कपडे शर्टं पॅट व महिनाभर पुरेल इतके धान्यासह किराणा सामान वाटप करण्यात आले. यावेळी सोशल डिस्टिंक्शनचे काटेकोर पालन करण्यात आल्याचे दिसून आले.लग्नाला होणारा अनाठायी खर्च न करता तो गोरगरीबांना मदतीसाठी खर्चं करा, त्यांचे आशीर्वाद मिळेल असे वर रोहिदास जुनघरे व वधु धन्वंती घरत यांनी बोलताना सांगितले. लाॅकडाऊन काळात विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन वधुवरांनी केले. यापुढे विवाहसोहळे थाटामाटात न करता अनाठायी खर्च करू नये अशी मागणी या वधुवरांनी करुन समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.