• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

वावोशी येथील रामनवमी उत्सवावर कोरोनाचे सावट


वावोशी/जतीन मोरे :-

कोरोना नामक विषाणूने जगभरात थैमान घातले असून त्याची झळ आता महाराष्ट्रातही येऊन पोहोचली असून या रोगाला हद्दपार करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन सर्वतोपरी शर्थीचे प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शासनाने २२ मार्चला संचारबंदीचे आदेश दिले असून या आदेशाचे पालन करण्याच्या दृष्टिकोनातून वावोशी येथील रामजन्मोत्सव मंडळाने रामनवमी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.                           सालाबादप्रमाणे वावोशी येथे रामनवमीला सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. या सप्ताहात अखंड हरीनाम पारायण,सांस्कृतिक कार्यक्रम आणि जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात येत असते. त्यामुळे या सप्ताहाला एक वेगळीच रंगत येत असते. त्यामुळे हा उत्सव लोकप्रिय झाला असून भक्तांसाठी तर एक वेगळी पर्वणीच ठरत असतो. त्यामुळे या उत्सवाला खालापूर तालुक्यासह जिल्ह्याबाहेरीलही भक्तगण हजेरी लावत असतात. परंतू कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रामनवमी उत्सव रद्द करण्याचे वावोशी रामजन्मोत्सव मंडळाने ठरवले आहे.