• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

वावोशी फणसवाडीतील आदिवासी ग्रामस्थांची पाण्याची समस्या होणार दूर


वावोशी फणसवाडीतील आदिवासी ग्रामस्थांची पाण्याची समस्या होणार दूर, माजी सरपंच राजू शहासने यांच्या पाठपुराव्याला यश

वावोशी : जतिन मोरे वावोशी ग्रामपंचायत हद्दीतील फणसवाडी या आदिवासी वाडीत आदिवासी विकास प्रकल्पाच्या पेयजल योजनेच्या कामाचा शुभारंभ विद्यमान उपसरपंच सुनीता भालेराव आणि सामाजिक कार्यकर्ते नंदू शहासने यांच्या हस्ते करण्यात आला. या योजनेच्या माध्यमातून होणाऱ्या कामामुळे आदिवासी बांधवांची पाण्याची समस्या कायमची दूर होणार आहे. वावोशीपासून३ ते ४ किलोमीटर अंतरावर असणारी फणसवाडी हा अतिदुर्गम डोंगराळ भागातील २० ते २५ आदिवासी कुटुंबाची लोकवस्ती असलेला भाग असून दांडवाडी आदिवासी वाडीवर पाणीपुरवठा योजना कार्यरत आहे परंतू भौगोलिक परिस्थितीमुळे फणसवाडी या आदिवासी ग्रामस्थांना पाणीपूरवठा होत नसल्याने या ठिकाणी पाण्याची जटिल समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे येथील आदिवासी महिलांना पाण्यासाठी दीड ते दोन किलोमीटर अंतर पायपीट करावी लागत असे. त्यांना दररोज हंडा डोक्यावर घेऊन दीड ते दोन किलोमीटर अंतराचा डोंगर उतरणे आणि चढणे अशी कसरत करून पाणी आणावे लागते. २०१५-१६ मध्ये वावोशी ग्रामपंचायत सत्तेवर असणारे माजी सरपंच राजू शहासने यांना या समस्येची जाण होती, त्यामुळे त्यांनी त्यावेळी आदिवासी विकास योजनेतून रस्ते आणि पाण्याच्या योजनेचा प्रस्ताव मांडला होता. परंतू राजू शहासने यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाल्यामुळे आदिवासी बांधवांची पाण्यासाठी होणारी वणवण आता थांबणार आहे, त्यामुळे राजू शहासने यांनी वेळ न दवडता या योजनेला मार्गी लावण्याचा चंग बांधला आहे. या योजनेच्या माध्यमातून दाराजवळ नळ येणार असल्याने महिलांच्या डोक्यावरील हंड्या चा भार कमी होणार आहे,त्यामुळे आदिवासी ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या कामाच्या शुभारंभावेळी ग्रामपंचायत सदस्य संतोष वाघमारे, महेश कडू, सतिश दरेकर, भारती नाईक, सामाजिक कार्यकर्ते दिलीप मिरवणकर,गोविंद वालम, रविंद्र भालेराव, राकेश शिर्के, मयूर धारवे, राजू उतेकर,संकेत धारवे,तानाजी शिंदे,रोहित वालम, अक्षय चौधरी, रोशन काने,किशोर वालम, किरण आढावकार आणि ग्रामस्थ सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करुन उपस्थित होते.

प्रतिक्रिया
भौगोलिक परिस्थिती मुळे फणसवाडी या आदिवासी ग्रामस्थांना पाणीपूरवठा होत नसल्याने या ठिकाणी पाण्याची जटिल समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे येथील आदिवासी महिलांना पाण्यासाठी दीड ते दोन किलोमीटर अंतर पायपीट करावी लागत असे. त्यांना दररोज हंडा डोक्यावर घेऊन दीड ते दोन किलोमीटर अंतराचा डोंगर उतरणे आणि चढणे अशीप्रतिक्रिया कसरत
करून पाणी आणावे लागत होते. २०१५-१६ मध्ये आदिवासी विकास विभागाला दिलेल्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाल्याने आदिवासी बांधवांची पाण्याची समस्या मार्गी लागली आहे. - राजू शहासने (माजी सरपंच - वावोशी)
18 views0 comments