- हक्कासाठी आंदोलन
वावेघर ग्रामपंचायतीने ठेवला इतर ग्रामपंचायतीमध्ये वेगळा आदर्श ; अपंगांना केली आर्थिक मदत
वावेघर ग्रामपंचायतीने ठेवला इतर ग्रामपंचायत मध्ये वेगळा आदर्श;अपंगांना केली आर्थिक मदत

प्रतिनिधी : प्रतिक चाळके
कोरोना विषाणू (कोव्हीड-१९) या रोगानी राज्यात थैमान घातला असून नागरिकांच्या सुरशेतेसाठी सरकार हे कोरोना विषाणूच्या लढ्याला दोन हात करत असून कोरोना विषाणूच्या रोगाला सामोरे जात आहे. तसेच रसायनी येथील वावेघर ग्रामपंचायतमधील नागरिक सुद्धा सरकारच्या आदेशाचे पालन करत आहेत.
वावेघर ग्रामपंचायतीने इतर ग्रामपंचायत समोर वेगळा असा आदर्श ठेवला आहे. वावेघर ग्रामपंचायतीने अपंग व्यक्तींच्या आर्थिक परिस्थिती लक्षात घेतली असून वावेघर ग्रामपंचायतने अपंगांना आर्थिक मदतीतीचा हात दिला आहे. वावेघरमध्ये राहणाऱ्या अपंग व्यक्तींना वावेघर ग्रामपंचयातीने ग्रामपंचायत निधीमधून १०,९००/- रुपयांचा धनादेश दिला असून वावेघर ग्रामपंचायतीने अपंग व्यक्तीची आर्थिक परिस्थिती ही सावरली आहे.
यावेळी धनादेश वाटप करताना वावेघर ग्रामपंचायतीचे सरपंच-विजय नामु चव्हाण, उपसरपंच- विलास माळी, सदस्य- जगन्नाथ चव्हाण, रवी राठोड, मनोज पवार, महादेव कांबळे, ज्ञानेश्वर माळी, अशोक गायकर, विनोद राठोड, गुरुनाथ माळी, हुसेन मुल्ला, दीपक बरवी, संध्या भोईर, समृद्धी भगत हे उपस्थित होते.