• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

लाडीवली वाडी येथे जिवनाश्यक वस्तू वाटप, राष्ट्रीय मानवाधिकार परिषद (ह्यूमन राईट्स) यांचा पुढाकार


लाडीवली वाडी येथे जिवनाश्यक वस्तू वाटप, राष्ट्रीय मानवाधिकार परिषद (ह्यूमन राईट्स) यांचा पुढाकार पाताळगंगा : काशिनाथ जाधव

(२४ एप्रिल) - गेल्या महिनाभर संचार बंदि असल्यामुळे प्रत्येकजण घरामध्ये अडकले आहेत. हाताला काम नसल्यामुळे बाहेरून पैसे येणाचे मार्ग बंद झाले. डोंगराळ भागात वास्तव्य करणारा अदिवासी समाज हा रोजच्या मिळालेल्या पैश्यातून आपले घर खर्च चालवित असतो मात्र. महिनाभर घरामध्ये राहत असल्यामुळे अनेकजण त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे करीत आहे. त्यांच्यासाठी जिवनाश्यक वस्तू तर काही दानशूर व्यक्तींना भाजी पाला देवून सामाजिक बांधिलकी जोपासत आहे. आपटा येथिल असलेली लाडीवली अदिवासी वाडी येथे जावून त्यांची समस्या विचारांतून घेवून राष्ट्रीय मानवाधिकार परिषद (हुमन राइट्स) यांनी जिवनाश्यक वस्तू वाटप केल्या.

             प्रत्येकाला पोटभर अन्न मिळावे कोणीही उपाशी राहू नये यासाठी गेले महिनाभर विविध संघटना दान शूर व्यक्ती आपल्याला शक्य होईल त्या विचारांतून मदत करीत आहे. गेले महिनाभर घरामध्ये असल्यामुळे काही व्यक्तींच्या घरामध्ये धान्यांचा एकही दाना नसतांना एक पाऊल पुढे टाकत मदत करण्यासाठी प्रत्येकांचे हात पुढे सरसावत आहे. कारण माणूस जगला पाहिजे हे धोरण मनाशी बाळगून प्रत्येकजण आपल्या परीने मदत करीत आहे. यावेळी या वाड्यामध्ये जावून त्यांस जिवनाश्यक वस्तू देण्यात आल्या यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर समाधानांचे हास्य फुलतांना पहावयास मिळाले.

        यावेळी या वाड्यामध्ये जिवनाश्यक वस्तू वाटप करण्यात आले. शिवाय संचार बंदीचे उल्लंघन न करता सोशल डिसस्टंस ठेवून रसायनी शहराध्यक्ष  गणेश कृष्‍णा गलांडे,राजू साळवी, नंदलाल झिनजोरे, रियाज शेठ अन्सारी, तसेच वावेघर ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य मनोज पवार यांनी देखील या कार्यक्रमास हजर राहून आपली सामाजिक बांधिलकी जपली. तसेच लाडीवली वाडीचे सरपंच राम पवार यांनी राष्ट्रीय मानवाधिकार परिषद कोकण विभाग अध्यक्ष लियाकत शेख यांचे आभार मानले. यावेळी प्रत्येकांच्या घरी जावून हे जिवनाश्यक वस्तू वाटप करण्यात आले.


फोटो : लाडीवली अदिवासी वाडीमध्ये जिवनाश्यक वस्तू वाटप करतांना लियाकत शेख 

(छाया : काशिनाथ जाधव, पाताळगंगा)

42 views1 comment

Recent Posts

See All

महाराष्ट्रात उद्यापासून रात्रीची संचारबंदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय

🎤 *_सम्राट मराठी LIVE_* 🌐 ⏩ *ब्रेकिंग न्यूज* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ _*महाराष्ट्रात उद्यापासून रात्रीची संचारबंदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय.*_ https://youtu.be/122_BuNRwTA 👆🏻 *बातमी पाहण्यासाठ

™© Copyright - dont copy this text™