• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

लोकांसाठी केलेल्या कामाचे समाधान मिळते म्हणून या मार्गावरून चालण्याचा प्रयत्न केला-प्रगती विचारे

Updated: Jul 15, 2020


चौक : अर्जुन कदम

मिळणारे प्राधिकार आणि त्याचा वापर जनसेवा म्हणून केल्यास त्याचा उपयोग जनतेला होतो,आणि त्याचे स्वतःला समाधान खूप मिळते,म्हणून मी ह्या क्षेत्राची निवड केली.असे प्रगती किसन विचारे उप मुख्यकार्यकारी अधिकारी श्रेणी-१ यांनी सांगितले.

खालापूर तालुक्यात ग्रामीण भागातील वावर्ले या आपल्या जन्मगावी पहिली ते दहावी पर्यंत शिक्षण घेऊन एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन उप मुख्यकार्यकारी अधिकारी श्रेणी-१ म्हणून नाशिक जिल्हा परिषदेत रुजू झालेल्या कु.प्रगती किसन विचारे यांनी सांगितले.मुळातच पीएचडी करण्याचा कल होता,पण घरातील वातावरण सामाजिक व राजकीय होते,वडील सक्रिय होते आणि त्यात मित्रमंडळी यांनी सांगितले,आणि या क्षेत्राकडे वळण लागले.दुसऱ्या मुलाखतीत औद्योगिक अधिकारी तर तिसऱ्या मुलाखतीत उप मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून निवड झाली.मुंबई दादर येथील राम नारायण रुईया कॉलेज मधून एमएससि केले. या प्रवासात कुटुंबातील सर्वांचा पाठिंबा मिळाला,तो आजही असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.मुळातच मी ग्रामीण भागातील असल्याने ग्रामीण भागाचे प्रश्न जवळून बघितले आहेत,त्यामुळे विश्वासाने ही जबाबदारी पार करीन असा सार्थ विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.

50 views0 comments
™© Copyright - dont copy this text™