- हक्कासाठी आंदोलन
लोकसहभागातून उभे राहिलेले तलाठी कार्यालय सामान्य माणसाला मंदिर वाटले पाहिजे -जिल्हाधिकारी रायगड

चौक : अर्जुन कदम
जनतेने आपले काम सहज व प्रामाणिक होण्यासाठी लोकसहभागातून उभे केलेले तलाठी कार्यालय सर्वसामान्य शेतकरी याच्यासाठी हक्काचे व न्यायाचे मंदिर असावे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी व्यक्त केले.
खालापूर तालुक्यातील खोपोली महसूल मंडळाच्या अखत्यारीत होनाड तलाठी कार्यालयाच्या नवीन वास्तूच्या लोकार्पण सोहळ्यात त्या बोलत होत्या.अशीच सुस्थितीत व परिपूर्ण कार्यालये सम्पूर्ण जिल्ह्यात व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी या सजेत औद्योगिक क्षेत्र जास्त आहे,त्यामुळे स्थानिक शेतकरी याच्यासाठी ते कायमस्वरूपी आपले कार्यालय त्याला वाटावे असे काम झाले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून कोरोना महामारीच्या संकटाला शासकीय नियमांचे पालन करून आपला परिसर निर्जंतुक ठेवावा असे आवाहन केले.या कार्यालयाच्या क्षेत्रात ढेकू, होनाड, चिंचवली गोहे, आत्करगाव, आडोशी ही पाच महसूल गावे व दोन आदिवासीवाड्या येत असून औद्योगिक क्षेत्र जास्त आहे. उपविभागीयअधिकारी वैशाली परदेशी, तहसीलदार इरेश चप्पलवार, नायब तहसिलदार जयश्री जोगी, जिल्हा तलाठी संघाचे अध्यक्ष संतोष जांभळे, मंडळ निरीक्षक विशे, तलाठी राठोड, स्थानिक तलाठी अभिजित हीवरकर उपस्थित होते.