• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

लॉकडाऊन काळात वृक्ष संवर्धन, रामदास काईनकर यांचा स्तुत्य उपक्रम


चौक : अर्जुन कदम

लॉकडाऊन काळातच नव्हे तर नेहमीच वृक्षसंवर्धन कामात वेस्त असलेले रामदास काईनकर यांनी उन्हाळ्यात झाडांना पाणी देण्यास सुरुवात केल्याने,लावलेली झाडे बहरन्यास सुरुवात झाली.

वावंढळवाडी येथील कृषीउद्योजक व वृक्षप्रेमी रामदास काईनकर यांनी गेली काही वर्षे झाडे लावून ती जगविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सद्द्या लॉकडाऊन असल्याने अनेक कामे बंद आहेत. रामदास यांनी अनेक झाडे लावून ती जगविण्यासाठी प्रयत्न देखील केला आहे,आज वावंढळवाडी परिसरात अनेक झाडे उभी आहेत.आता लावलेल्या झाडांना उन्हाळ्यात पाणी देण्याची गरज असल्याने स्वतःच्या गाडीत पाणी साठवन टाक्या ठेऊन त्यातून पाईपद्वारे ते झाडांना पाणी देत आहेत.त्यांच्या या कामाचे नेहमीच कौतुक होत असते.रामदास हे अपघातग्रस्त लोकांच्या मदतीलाही जातात.

लावलेल्या झाडांना काहीजण जाणीवपूर्वक आग किंवा तोडली जात असल्याचे त्यांनी सांगून दुःख वेक्त केले.वृक्षसंवर्धन मुळे उन्हाळ्यात आल्हाददायक व नेत्रसुख मिळते.वनसंपदा ही आपली राष्ट्रीय सम्पत्ती आहे,वृक्षसनवर्धनाची व संरक्षणाची जबाबदारी सर्वांनी घेतल्यास हरित क्रांती सुरू होईल, हा हेतू पुर्णत्वास गेल्यास उज्वल भविष्य असेल.असेही ते म्हणाले.


12 views0 comments