• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

रोहिदास कोचिंग क्लासेस चा दहावीचा १०० टक्के निकाल

तालुक्यातील रोहिदास कोचिंग क्लासेस चा दहावीचा निकाल १०० टक्के

आपली शंभर टक्के निकालाची परंपरा राखली...


जी. जे. एम. इंग्लिश मिडीयम खालापूर शाळेतून सिद्धी शरद कुंभार हि ८८.८० टक्के गुण मिळवून सर्वप्रथम

कुमुद तानाजी खंडागळे हि ८५.४० टक्के गुण मिळवून सुधागड एज्युकेशन सोसायटी पालीचे माध्यमिक विद्यामंदिर पोयंजे शाळेतून सर्वप्रथम

रसायनी : विशेष प्रतिनिधी

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा आॅनलाईन निकाल नुकताच जाहीर झाला असून खालापूर तालुक्यातील नामांकित रोहिदास कोचिंग क्लासेस चा इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. या क्लासने आपली शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.

रोहिदास कोचिंग क्लासमधून आणि जी. जे. एम. इंग्लिश मिडीयम खालापूर शाळेतून सिद्धी शरद कुंभार हिने ८८.८० टक्के गुण मिळवून सर्वप्रथम येण्याचा मान पटकावला तर कुमुद तानाजी खंडागळे हिने ८५.४० टक्के गुण मिळवून

सुधागड एज्युकेशन सोसायटी पालीचे माध्यमिक विद्यामंदिर पोयंजे शाळेतून सर्वप्रथम येण्याचा इतिहास रचला.याशिवाय खुशबू जगजीवन यादव ८४.२०% , पूनम कमलाकर मते ८२.२० % ,स्वयंम रमेश लहाने ८१% तर तन्वी कमलाकर पवार ८०.६० टक्के गुण मिळवून उज्वल यश संपादन केले आहे,याशिवाय ३० हून अधिक विद्यार्थी प्रथम श्रेणीत येऊन अभिनंदनास पात्र ठरली आहेत.या सर्वच विद्यार्थ्यांच्यावर समाजातील सर्वच स्थरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

तालुक्यातील ग्रामीण भागात रोहिदास कोचिंग क्लासेस चा एक नामांकित क्लास म्हणून गेली १९ वर्षे बोलबाला आहे.नुकताच गेल्यावर्षी खालापूर तालुक्यातील सर्वोत्तम कोचिंग क्लास म्हणून रोहिदास कोचिंग क्लासने पुरस्कार पटकावला आहे.क्लासचं ब्रीद वाक्यच आहे की,आम्ही तुमचे भविष्य घडवत नाही, तर आम्ही तुम्हालाच भविष्यासाठी घडवितो.आजपर्यंत क्लासमधील हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन उज्वल यश संपादन केले आहे.रोहिदास कोचिंग क्लासेस चे संचालक श्री रोहिदास राघो ठोंबरे सरांचे म्हणणे आहे की,विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासात जर नेहमी सातत्य ठेवलं आणि उत्तम प्रयत्न केले तर यश तुमच्या पदरात शंभर टक्के आहे.याकारणानेच की काय तालुक्यातील चौक,वाशिवली आणि बारवईपूल शाखेचा क्लासचा निकाल शंभर टक्के लावण्याची आपली यशस्वी परंपरा कायम ठेवली आहे.

71 views0 comments