• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

रेशनिंग न मिळणाऱ्या लोकांची तूराडे ग्रामपंचायतीकडून दखल

Updated: May 2, 2020


गुळसुंदेगुळसुंदे : व्ही. व्ही. जी

जगात आणि भारतामध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस

रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे त्यामुळे 24 मार्चपासून सुरु असलेल्या लॉक डाऊन मुळे अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. परिणामी अनेकांना उपासमारीची वेळ आली आहे. सरकारकडून रेशनकार्डधारकांना स्वस्त दरात गहू तांदूळ आणि केंद्र सरकारकडून मानसी पाच किलो तांदूळ याप्रमाणे मिळाले आहे आणि मिळणार आहे. परंतु तुरा डे हद्दीमध्ये 155 कुटुंबांना ज्यांच्याकडे रेशनिंग कार्ड नाही. अशा लोकांना कुठूनही रेशनिंग मिळणार नव्हते. अशा लोकांची दखल तूराडे ग्रामपंचायत चे सरपंच चंद्रकांत भोईर यांनी घेऊन लोणा इंडस्ट्रीज व ठक्कर कंपनी यांचे सहकार्य घेऊन 155 कुटुंबांना अन्नधान्य व किराणा वस्तूंचे वाटप केले.

यावेळी तूराडे ग्रामपंचायतीचे सरपंच चंद्रकांत भोईर म्हणाले हे आमचं संपूर्ण परिस्थितीवर लक्ष आहे. परिस्थिती जरी गंभीर असली, तरी आम्ही खंबीर आहोत आपण फक्त घरात राहून शासनाला मदत करा. हात नेहमी स्वच्छ ठेवा व कोरोनाला दूर पळवून लावा असा संदेश दिला. तसेच या कामी लोना इंडस्ट्रीज आणि ठक्कर कंपनी यांचे आभार व्यक्त करून असेच सहकार्य नेहमी करतील अशी आशा व्यक्त केली.


यावेळी माजी उपसरपंच मनोहर चव्हाण, उपसरपंच हरीश पठारे,ग्रामसेविका अस्मिता मोकल, भाऊ ठाकूर, विश्वनाथ गायकवाड, प्रतिभा कोनकर, शीतल माळी, दादासाहेब आटपाडकर, सुनील राठोड व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.


53 views0 comments