• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

रायगड छात्र भारती विद्यार्थी तर्फे किराणा सामानाचे वाटप


मोहोपाडा : गौतम सोनावणे

कोरोना विषाणूने जगभर थैमान घातल्याने देशभरासह राज्यात लॉक डाऊन असल्याने या लॉक डाउनला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. परंतु हातावर पोट भरणारे काम धंदे बंद असल्यामुळे रोजंदारी व मजुरी करणाऱ्या बांधवांवर घरातच बसण्याची वेळ आली आहे. घरात असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा याबाबत काही कार्यकर्त्यांना त्यांच्या परिस्थिती बद्दल माहिती झाली. त्यावेळी रायगड छात्र भारती विद्यार्थी रसायनीच्या वतीने नवीन पोसरी येथील 30 गरजू कुटूंबाला किराणा सामानाच्या वस्तू देऊन मदतीचा हात दिला. नवीन पोसरी येथील 30 कुटूंबाला प्रत्येकाला 218 किलो तांदूळ, 218 किलो आटा, 90 किलो तेल, 70 किलो डाळ, 34 किलो कांदा, 60 किलो बटाटे, असे सामानाचे वाटप घरोघरी जाऊन करण्यात आले आहे. यावेळी वाटपप्रसंगी रायगड छात्र भारती विद्यार्थी रसायनीचे जितेश किर्दकुडे, मिहीर दोशी, भारतीचे शिक्षक मंदार वेदक यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थिती गरजू नागरिकांनी यावेळी विद्यार्थी संघटने चे आभार मानले.