• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

रायगडमध्ये १५ जुलै ते २४ जुलै लॉकडाऊन जाहीर, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद
आंदोलन : प्रतिनिधी

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामूळे रायगड जिल्ह्याची परिस्थिती गंभीर बनली असून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण रायगड जिल्ह्यात १५ जुलै ते २४ जुलै दरम्यान १० दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला. या १९० दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहतील अशी माहिती रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे रायगड जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर बनली असून शहरी भागांसोबत ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव होऊ लागल्याने शासनासमोर गंभीर आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे ही कोरोनाची साखळी तोडण्याकरिता १० दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत रायगड जिह्यात कोरोनाचे ७ हजार ५५१ रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी ४ हजार २९१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ३ हजार २६० पॉजिटीव्ह रुग्ण आहेत, तर आतापर्यंत जिल्ह्यात २१२ जणांचा मृत्यू झाला आहे.