• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

रोटरी क्लब ऑफ पाताळगंगा च्या वर्धापन दिनानिमित्त रसायनी पोलीस स्टेशनला अखंडित वीजपुरवठा


आंदोलन : गौतम सोनावणे

रोटरी क्लब ऑफ पाताळगंगा च्या 31 व्या वर्धापन दिनानिमित्त क्लब अध्यक्षा ऋतुजा भोसले यांनी रसायनी पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक सुजाता तानवडे यांच्या सोबत झालेल्या चर्चेनुसार पोलिस स्टेशनला अखंडित वीजपुरवठा सुरू रहावा यासाठी क्लब तर्फे रसायनी पोलिस स्टेशनला इन्व्हर्टर आणि 2 बॅटरीज देण्यात आल्या.

यावेळी क्लबचे ज्येष्ठ सभासद रो. होनावळे यांनी क्लबच्या वतीने, कोरोनाच्या या महामारीच्या संकटातही पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य निभावत आहेत म्हणून त्यांचे आभार मानले, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील व देशभरातून ज्या पोलिस कर्मचार्यांनी या संकटात आपल्या प्राणांचे बलिदान दिले अशांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी क्लब सदस्यांचे आभार मानले. वर्धापन दिनाच्या या सोहळ्याला क्लब सचिव रो. गणेश काळे, रो. बाळकृष्ण होनावळे, रो. सुनील भोसले, रो. दीपक चौधरी, रो. अमीत शहा, रो. देवेंद्र महिंद्रकर, रो. मेघा कोरडे, रोटरॅक्ट क्लब अध्यक्ष अनिलकुमार सैनी, भावी अध्यक्ष रोटरॅक्ट सदस् मोहोम्मद शयान उस्मानी, रोटरॅक्ट सदस्य शर्विन भोसले, रोहन गावडे, आणि सुजीत मोहनदास उपस्थित होते सर्व रोटरॅक्ट सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले