• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

रसायनीला वस्त्रोउद्योग मत्स व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांची भेट


रसायनी : राकेश खराडे

रायगड जिल्ह्यातील नैसर्गिक चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या बंदरांना नामदार अस्लम भाई शेख (वस्त्रोद्योग,मत्स व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा पालक मंत्री- मुंबई शहर) यांनी दोन दिवस पाहणी दौरा केला. मंत्री अस्लम शेख यांनी मच्छीमारांची भेट घेऊन त्यांना होणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या व नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत करण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांकडे प्रस्ताव पाठविणार असल्याचे सांगितले.

महाराष्ट्राचे ( वस्त्र उद्योग मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री मुंबई शहर ) अस्लम भाई शेख यांनी महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव प्रशांत प्रकाश गायकवाड यांच्या रसायनी येथील निवासस्थानी सदिच्छा दिली भेट. अस्लम भाई शेख यांच्या भेटीने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला वाढी करता कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून ताकद देण्याचे काम अस्लम भाई यांनी करावे असे आमदार भाई जगताप यांनी मंत्री महोदयांना विनंती देखील केली या भेटीदरम्यान माजी सरपंच तथा काँग्रेस पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष कृष्णा शेठ पारंगे व महाराष्ट्र प्रदेश पर्यावरण विभागाचे उपाध्यक्ष अशोकभाऊ मुंढे ,समाजसेवक प्रकाशशेठ गायकवाड यांनी मजूर कामगारांना केलेल्या मदतीचे कौतुक करून यापुढे कोणत्याही प्रकारच्या मदती करीता मी व भाई जगताप आपल्या पाठीशी आहोत असे देखील सांगितले. त्याठिकाणी उपस्थित म.प्र.यु.सचिव प्रशांत प्रकाश गायकवाड महाराष्ट्राचे काँग्रेस पर्यावरण सेलचे उपाध्यक्ष अशोक मुंढे, माजी सरपंच कृष्णा शेठ पारंगे, रायगड जिल्हा महिला उपाध्यक्ष दीपाली ताई म्हात्रे, रायगड जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष सागर सुखदरे ज्ञानेश्वर पाटील, श्रीकांत खंदारे, संदेश डवळे , शयान उस्मानी, दिवेश पाटील, कृष्णा झोंबडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.