• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

रसायनी येथील पानशील गावामध्ये बेड्याला आग; सुदैवाने मोठा अनर्थ टळला


💥_____*(हक्कासाठी आंदोलन)*_____💥

प्रतिक चाळके : रसायनी

देशासह राज्यात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव हा वाढत असून सर्वत्र ठिकाणी संचारबंदी लागू केली असल्याने शहरांसह ग्रामीण भागात सुद्धा लॉकडाउन परिस्थिती आहे. रसायनी परिसर हा ग्रामीण भाग असून या ठीकाणी गाववस्ती जास्त प्रमाणात आहेत.

सर्वत्र लॉक डाउन परिस्थिती असताना शांततामय वातावरणात दिनांक २९ एप्रिल रोजी रसायनी परिसरातील वासंबे हद्दीतील पानशील या गावामध्ये दत्तात्रेय कथारे यांच्या बेड्याला अचानक आग लागली.

दिनांक २९ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली असल्याचे दत्तात्रेय कथारे यांना समजले असता त्यांनी त्वरीत अग्निशमन दलाला पाचारण केले. त्यानंतर लगेचच कथारे यांच्या भावाने म्हशींची बेड्यातून सुटका करून त्यांचे प्राण वाचविले. तेव्हा या आगीवर रसायनी येथील एम.आय.डी. सी अग्निशमन केंद्राच्या जवानांनी घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणत त्या आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीमध्ये म्हशींचे खाद्य, पेंडा आणि बेड्याचे वासे सुद्धा जळाले असून यामध्ये दोन म्हशी भाजल्या आहेत. या आगीमध्ये कोणतीही मनुष्यहानी झाली नसून मोठा अनर्थ टळला. परंतु या दुर्घटनेत दत्तात्रेय कथारे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच वासंबे ग्रामपंचायतीच्या सरपंच ताई पवार, माजी सरपंच कृष्णा पारंगे तसेच संदीप मुंढे यांनी घटना स्थळी भेट देऊन परिस्थितीची शहानिशा केली. तसेच

💥_____*(हक्कासाठी आंदोलन)*_____💥

मोहोपाड्याचे तलाठी लोखंडे तात्या यांनी झालेल्या घटनेचा पंचनामा केला असून सदरचा अहवाल तहसील कार्यालयाकडे पाठवण्यात येईल असे सांगितले.

_________________________________________

ह्या आगीमध्ये अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणत आगीवर नियंत्रण मिळवले असून जो पुढचा काही अनर्थ होता तो टळला असून म्हशींचा खाद्य,पेंडा, यांसह बेड्याचा जे काही नुकसान झाले असून योग्य तो पंचनामा करून तहसीलदारांकडे नुकसानभरपाईसाठी पाठवला जाईल.

लोखंडे (मोहोपाडा तलाठी)


सकाळी ९:०० च्या सुमारास आग लागल्याची निदर्शनास आल्यानंतर लगेच अग्निशमन दलाल संपर्क केला असता काही वेळेतच अग्निशमन दलाच्या जवानांनी येऊन आगीला आटोक्यात आणत आग विझवली. परंतु या आगीमध्ये ६०० पेंडा, ५ गोणी खाद्य, १० कोंबड्या यांच्यासह बेड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दत्तात्रेय कथारे (बेडा मालक - पानशिल)