- हक्कासाठी आंदोलन
रसायनीमध्ये कोरोना विषाणूने शिरकाव केल्यामुळे दि. २७/२८ मे रोजी जनता कर्फ्यु

आंदोलन : प्रतिनिधी
रसायनी परिसरात कोरोना विषाणूने शिरकाव केला असून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रसायनी पोलिसांकडून रसायनी परिसरातील गावातील पोलीस पाटलांना आपआपल्या गावामध्ये लाऊडस्पीकरद्वारे जनजागृती करण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.
रसायनी परिसराची मुख्यबाजारपेठ ही मोहोपाडा असून या बाजारपेठेत रसायनी परिसरातील नागरिक खरेदीसाठी येत असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. तसेच मोहोपाडा बाजारपेठेत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सर्वपक्षीय पदाधिकारी, व्यापारी असोसिएशन, यांच्यासह जनतेने जनतेच्या रक्षणासाठी २७ व २८ मे रोजी जनता कर्फ्यु लागू करण्याचे ठरवले आहे. या जनता कर्फ्युमध्ये फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व जीवनावश्यक सेवा सुरू राहणार असून नागरिकांनी या जनता कर्फ्युचे पालन करावे असे आवाहन होत आहे.
रसायनीतील जनता कर्फ्यु हा दोन दिवसासाठी असून दोन दिवसानंतर सरकारने केलेल्या ३१ तारखे पर्यंतच्या लॉक डाउन काळात बाजारपेठ ही दुपारी २.०० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.