• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

रसायनीमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियोजनाची गरज


रसायनी : प्रतिक चाळके

रायगड जिल्हा हा ऑरेंज झोनमध्ये असून लॉक डाउनच्या काळात सरकारने जीवनावश्यक सुविधांसाठी परवानगी दिली असल्याने रसायनीमधील मोहोपाडा मार्केटमध्ये भाजीपाला, अन्नधान्य, मेडिकल, यांच्या नावाखाली लॉक डाउनचे सारे नियम पायदळी धुडकावून नागरिक हे सर्रास बाहेर फिरत आहेत. रसायनीतील मोहोपाडा मार्केटमध्ये काहिकेल्या गर्दीचे प्रमाण हे कमी होण्याचे चिन्ह नाहीत.

मोहोपाडा परिसर हा मोठे शहर होत असल्याने तेथील रहिवाश्यांची संख्या सुद्धा वाढत आहे. मोहोपाडा मार्केटमध्ये अफाट गर्दी होत असल्याने ८०℅ नागरिक हे बिनधास्तपणे फिरत असल्याने याचा ताण पोलीस, डॉक्टर, राज्यसरकार, केंद्रसरकार, सर्व ग्रामपंचायत यांच्यावर येत आहे. परंतु रसायनीमध्ये चुकून एखादी कोरोना रोगाची केस सापडली तर संपूर्ण मोहोपाडा मार्केटसह संपूर्ण रसायनी परिसर सुद्धा बंद करायला लागेल.

यासाठी ग्रामपंचायत आणि संबंधित अधिकारी यांनी जर काही मोहोपाडा मार्केटची नियोजनबद्ध व्यवस्था केली तर रसायनी परिसर हा कोरोना पासून दूर राहू शकतो. नियोजनबद्ध व्यवस्था म्हणजे मोहोपाडा मार्केटमध्ये प्रत्येक वाराला संबंधित गावांना प्रवेश दिला तर गर्दी कमी होण्याची शक्यता जास्त आहे.

उदाहरण :- सोमवारी - मोहोपाडा परिसर, मंगळवारी- चांभार्ली विभाग, बुधवारी - वावेघर, परिसर, गुरुवारी- कैरे विभाग, शुक्रवारी- चावना विभाग, शनिवारी- सावळा विभाग, रविवारी- बंद* अश्याप्रकारचे नियोजन केल्यास प्रत्येक वाराला रसायनी परिसरातील जे गाव आहेत त्यांचे विभाजन केल्यास मोहोपाडा मार्केट मधील गर्दीवर नियंत्रण राखता येईल. अशी मागणी तेजस वामन लबडे (नागरिक - खानावळे) यांनी केली.