• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

रसायनी पोलीसांकडून पोलीस पाटलांमार्फत जनजागृती करण्याचे आवाहन..


आंदोलन : रसायनी (प्रतिनिधी)

रसायनी परिसरार हा गेले दोन महिने कोरोना विषाणू पासून सुरक्षित होता. परंतु कोरोना विषाणूने रसायनी परिसरात प्रवेश केला असून दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे रसायनी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रसायनी परिसरात दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून एक रुग्ण शिवनगरवाडी येथील असून दुसरा रुग्ण दापीवली येथील आहे. दापीवली येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात दोन जण आले असून त्यातील एक जण चांभार्ली येथील राहणारा आहे तर दुसरा सावळा गावामध्ये राहणारा आहे. तरी सर्व पोलीस पाटलांनी सरपंच यांना सोबतीला घेऊन गावागावांमध्ये जनजागृती करण्यासाठी रिक्षा वरती स्पीकर लावून गावागावांमध्ये प्रचार करून सांगा की नागरिकांनी या आजाराला घाबरून जाऊ नका तुम्हाला या आजाराबद्दल (खोकला, सर्दी, भरपूर प्रमाणात ताप) ह्या प्रकारचे कोणतेही लक्षणे आढळल्यास तसेच आपल्याला वाटत असेल की आपल्याला काही प्रॉब्लेम आहे तर तुम्ही तपासणी करून घ्या. आणि त्याबाबत संबंधित ग्रामपंचायतीला कळवा. तसेच हा आजार बरा होणारा आजार असून आपण जर अंगावर काढला तर तो आजार वाढत जाईल आजार हा वाढू नये त्यासाठी ज्या नागरिकांना लक्षणे वाटत आहेत त्यांनी त्वरित तपासणी करून घेऊन या आजारावर योग्य उपचार घ्यावे.

तसेच गावागावांमध्ये जनजागृती करणे हे सरपंच आणि पोलीस पाटील यांचे काम असून त्यांनी नागरिकांच्या मनामधून त्या आजाराबाबतची भीती ही निघून जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक आहे. असे आवाहन रसायनीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सौ. सुजाता तानवडे यांनी केले.