• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

रसायनी परिसरात चक्रीवादळाचा धुमाकूळ; जनजीवन विस्कळीत


रसायनी : प्रतिक चाळके

बुधवार दि. ३ जून रोजी चक्रीवादळाने रुद्रावतार रूप घेतल्याने रसायनी परिसरात होत्याचे नव्हते करून टाकले. ह्या नैसर्गिक आपत्तीत सोसाट्याच्या वादळाबरोबर मुसळधार पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले. सकाळी सुमारे ११.००वाजल्यापासून सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत चक्रीवादळाचा रसायनीकारांना मोठा फटका बसला.

रसायनी परिसरात वादळामुळे दांडफाटा आपटा रोडवर जुनी झाडे रस्त्यावर कोसळली तर काही झाडे विद्युत वाहिन्यांवर कोसळले असल्याने विद्युत खांब हे वाकले गेले आहेत. काही झाडे मुलांपासून कोसळून रस्त्यालगत असणाऱ्या दुकानांवर कोसळली आहेत तर रसायनी परिसरातील गावागावातील घरांचे कौले, पत्रे, लोखंडी शेड, हे उडून गेली असल्याने अनेक नागरिकांचे संसार हे उघड्यावर आले असून त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.