• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

रसायनीतील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी राजकारण विसरुन महासंकटात एकत्र येण्याची गरज !

कोविड रुग्णालयासाठी वासांबे मोहोपाडा हद्दीत तहसिलदार व माजी आमदारांचा पाहणी दौरा

रसायनी : राकेश खराडे

वासांबे मोहोपाडा परिसरात दोन महिन्यांपेक्षा जास्त दिवस लाॅकडाऊनचे काटेकोर पालन केल्यानंतर लाॅकडाऊनमध्ये शिथिलीकरण होताच परिसरात कोरोना व्हायरसने शिरकाव करून वासांबे मोहोपाडा हद्दित कोरोना विषाणू संसर्गाने हाहाकार उडविला आहे. वासांबे मोहोपाडा हद्दित मंगळवारपर्यंत एकुण रुग्णसंख्या 130 झाली असून रुग्णांना रसायनी परीसरात उपचार मिळावे यासाठी परीसरात कोविड सेंटर उभारण्यात यावे अशी रसायनीकर मागणी करत आहेत.परिसरात रुग्णांना उपचार उपलब्ध व्हावा हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेऊन माजी आमदार मनोहर भोईर यांचे कार्य उरण विधानसभा मतदार क्षेत्रात सुरूच आहे.

खालापुर तालुक्यातील चौक येथे सोमवारी स्वॅब तपासणी मशीनचेही उदघाटन मा.आमदार मनोहर भोईर यांच्याहस्ते करण्यात आले. त्यामुळे चौक मंडलासह वासांबे मोहोपाडा हद्दीतील सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे.सध्या चौक मंडलात वासांबे विभाग येत असल्याने या सर्कंल विभागात मंगळवार दि.14 पर्यंत 214 कोरोना रुग्ण सापडले आहेत.तर पाच मयत आहेत.यात जवलपास 55 रुग्ण बरे झाले आहेत.

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर वासांबे मोहोपाडा विभाग, चौक विभागामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे.वासांबे मोहोपाडा हद्दीतील कोरोना रुग्ण संख्येचा कहर असाच राहिला तर भविष्यात वाईट परिस्थिती निर्माण होऊ शकते.यासाठी सर्वपक्षीयांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज आहे अशी रसायनीकर मागणी करत आहेत. यासाठी मा.आमदार मनोहर भोईर व तहसिलदार इरेश चप्पलवार यांनी वासांबे परिसरात मंगळवार दि.14 रोजी पाहणी दौरा केला.यावेळी मंडळ अधिकारी नितिन परदेशी,पंचायत समिती माजी सभापती रमेश पाटील,सरपंच ताई पवार,उप सरपंच राकेश खारकर ,पंचायत समिती सदस्य जगदीश पवार,समीर खाने,अजित सावंत,माजी उपसरपंच दत्ता खाने,स्वप्नील राऊत आदी उपस्थित होते.

200 views0 comments