• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

रसायनीतील विद्युत वाहिनी सुरळीत होण्यास आणखी ४ दिवस लागणार..

चक्रीवादळामुळे तडाख्यामुळे विद्युतवाहिनी खंडित,

विद्युत वाहिनी सुरळीत होण्यास आणखी लागणार ४ दिवस..

रसायनी : प्रतिक चाळके

रायगड जिल्ह्याला बुधवार दि. 3 जून रोजी झोडपलेल्या चक्रीवादळामुळे रसायनीतील विद्युत वाहिन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

आपटा सबस्टेशन पासून ते दांडफाटा पर्यंत मेन लाईनच्या ५० ते ६० तर, गावा - गावातील ४० ते ५० विद्युत खांबांवर लहान-मोठी झाडे पडल्याने मोहोपाडा आणि आपटा सबस्टेशनला मोठी हानी झाली आहे.

तसेच अस्ताव्यस्त झालेली दुर्दशा पुन्हा लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी विजकर्मचारी दिवस रात्र काम करत आहेत. आज दिनांक 5 जुन सायंकाळी 6:00 वा.पर्यंतच्या मिळालेल्या माहितीनुसार मोहोपाडा एम.ई.सी.बी कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून मोहोपाडा मधील १० डीपी चालू केल्या आहेत. तर चांभार्ली व रिस पर्यंतची विद्युत वाहिनीचे काम अंतिम टप्प्यात चालू असून काही भागातील वीजपुरवठा चालु झाला असून बाकी ठिकाणी सुद्धा काही तासातच वीजपुरवठा चालू होणार आहे.

तसेच एम.ई.सी.बी कर्मचारी मेन लाईन चालू करत असून एक-एक करत लोकल वीज लाईन सुद्धा चालू करत आहेत. विद्युत वाहिनी ही संपूर्णपणे चालू होण्यासाठी साधारण ४-५ दिवस लागण्याची शक्यता असून सदर शेडुंग ते भोकरपाडा पर्यंतचे काम सुद्धा लवकर होणार असल्याचे विद्युत उपअभियंता किशोर पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच विज वितरणच्या ग्राहकांनी आत्तापर्यंत सहकार्य केले तसेच पुढेही सहकार्य करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.